कामेरीची भैरवनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:53+5:302021-05-21T04:27:53+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील शुक्रवार दि, २१ व शनिवार दि. २२ मेरोजी होणारी ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा कोरोना ...
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील शुक्रवार दि, २१ व शनिवार दि. २२ मेरोजी होणारी ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे विश्वस्त सुनील पाटील यांनी दिली.
प्रथेप्रमाणे शुक्रवारी पहाटे पुजारी अशोक नीळकंठ
ग्रामदैवत भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या मूर्तींना अभिषेक घालून दैनिक पूजा करतील व त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल. कोणीही दर्शनासाठी अथवा नैवद्य घेऊन मंदिर परिसरात येऊ नये, असे आवाहन पुजारी अशोक निळकंठ यांनी केले आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असणारे धावते बगाड पाहण्यासाठी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने येतात. मात्र यावर्षी ते बंद राहील. त्यामुळे दर्शनासाठी अथवा बगाड पाहण्यासाठी कोणीही गर्दी करू नये. गावातील वाढती कोरोना रुग्णसंख्या विचारात घेऊन कोणीही पै-पाहुण्यांना यात्रेसाठी बोलवू नये, असे आवाहन देवस्थान समिती व कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीने केले आहे.