कामटेच्या सासºयाची कसून चौकशी सुरू--कोठडीत मारले.. आंबोलीत जाळले...महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:01 AM2017-12-14T00:01:35+5:302017-12-14T00:02:51+5:30

 Kamte's mother-in-law was thoroughly examined - beaten in custody ... burned in Ambalati ... | कामटेच्या सासºयाची कसून चौकशी सुरू--कोठडीत मारले.. आंबोलीत जाळले...महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

कामटेच्या सासºयाची कसून चौकशी सुरू--कोठडीत मारले.. आंबोलीत जाळले...महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

Next

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे याची सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून तपासावर विशेष लक्ष ठेवले असून त्यातून कांबळे याचे नाव पुढे आल्याची चर्चाही आहे.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
सीआयडीने आतापर्यंत तपासात बाळासाहेब कांबळे याचे नाव निष्पन्न झाले. तो कामटेच्या पत्नीचा मामा आहे. त्यालाही अटक करण्यात आली असून, न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. सीआयडीचे संजीवकुमार यांनी तपासावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. सीसीटीव्ही व इतर पुराव्यातून समोर आलेल्या प्रत्येकाची चौकशी व जबाव नोंदविले जात आहेत. या चौकशीतून कांबळे याचे नाव पुढे आल्याचे समजते. कांबळे याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे.

दोघांचा शोध सुरू
दरम्यान, अमोल भंडारेला कृष्णा नदीच्या घाटावर घेऊन बसलेल्या दोघांचा सीआयडीकडून शोध सुरु आहे. त्यांच्याबद्दल माहितीही मिळाली आहे. या माहितीची खातरजमा करण्याचे व पुरावा गोळा करण्याचे काम सुरु आहे. पुरावे हाती लागताच या दोघांना अटक होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Kamte's mother-in-law was thoroughly examined - beaten in custody ... burned in Ambalati ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.