शिराळा तालुक्यात काेराेनाचे दाेन नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:29 AM2020-12-06T04:29:07+5:302020-12-06T04:29:07+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात शनिवारी १०० अँटिजेन चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले. तालुक्यात ...

Kareena's new patient in Shirala taluka | शिराळा तालुक्यात काेराेनाचे दाेन नवे रुग्ण

शिराळा तालुक्यात काेराेनाचे दाेन नवे रुग्ण

Next

शिराळा : शिराळा तालुक्यात शनिवारी १०० अँटिजेन चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले. तालुक्यात आता ११ रुग्ण उपचाराखाली आहेत.

शनिवारी तडवळे व अंत्री खुर्द येथे प्रत्येकी १ असे नवीन २ रुग्ण आढळून आले. आत्तापर्यंत तालुक्यातील ९८ पैकी ९३ गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. आतापर्यंत तालुक्यात २ हजार १८८ रुग्ण आढळून आले असून, यापैकी २ हजार ९१ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या होमआयसोलेशन मध्ये ८, तर उपजिल्हा रुग्णालयात ३ असे ११ रुग्ण उपचाराखाली आहेत. आजअखेर शिराळा शहरातील १४ रुग्णांसाह तालुक्यातील ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण ४.२ टक्के आहे.

Web Title: Kareena's new patient in Shirala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.