कर्मवीर अण्णांनी रचनात्मक कार्याने चळवळ बळकट केली : निरंजन फरांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:48+5:302021-09-24T04:30:48+5:30
दुधोंडी : भारतीय प्रबोधनाच्या चळवळीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांनी रचनात्मक कार्य आणि प्रबोधनाची चळवळ ...
दुधोंडी : भारतीय प्रबोधनाच्या चळवळीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांनी रचनात्मक कार्य आणि प्रबोधनाची चळवळ बळकट केली, असे प्रतिपादन प्रा. निरंजन फरांदे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय व स्वामी रामानंद माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. निरंजन फरांदे बोलत होते.
यावेळी मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव, महेंद्र लाड, प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, प्राचार्य एन. आर. जगदाळे उपस्थित होते.
जे. के. (बापू) जाधव म्हणाले, श्रम आणि शिक्षणाची सांगड घालून स्वावलंबी शिक्षणाची मुहूर्तमेढ भारतामध्ये रोवली. गावखेड्यातील दीनदलितांपर्यंत शिक्षण पोहोचवून अण्णांनी महात्मा फुलेंचे कार्य खऱ्या अर्थाने वाढविले.
यावेळी मुख्याध्यापिका एल. एस. पाटील, एस. एस. खोत, उपप्राचार्य काकासाहेब भोसले आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनी प्रास्ताविक केले. एल. एस. पाटील यांनी आभार मानले. डॉ. तेजस चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.