कर्मवीर पतसंस्थेचे ५०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:22+5:302020-12-30T04:35:22+5:30
ते म्हणाले, विविध ठेव व कर्ज योजनेच्या माध्यमातून सभासदांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न संस्था सातत्याने करीत आहे. संस्थेने आपल्या ...
ते म्हणाले, विविध ठेव व कर्ज योजनेच्या माध्यमातून सभासदांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न संस्था सातत्याने करीत आहे. संस्थेने आपल्या कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना आधुनिक, सौजन्यपूर्ण सेवा देण्याचा संकल्प केला आहे. ५०० कोटी ठेवींचा विश्वास सोबत घेऊन आम्ही सभासदांच्या व संस्थेच्या हिताच्या आणखी चांगल्या योजना राबवू, असा संकल्प संचालक मंडळाने केला आहे. संस्थेच्या ठेवी ५०२ कोटी, कर्ज वाटप ३७८ कोटी, गुंतवणूक १६३ कोटी, वसुली भागभांडवल २१ कोटी ३० लाख, स्वनिधी ४५ कोटी ९६ लाख व संस्थेचे खेळते भागभांडवल ५७६ कोटी ४० लाख आहे. संस्थेला सतत ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. संस्थेला तिच्या कार्यासाठी विविध संस्थांकडून अनेकवेळा आदर्श पतसंस्था म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा भारती चोपडे, संचालक ॲड्. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, डॉ. नरेंद्र खाडे, ए. के. चौगुले, वसंतराव नवले, लालासाहेब थोटे, ललिता सकळे, डॉ. एस. बी. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांच्यासह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.