मिरजेत गांजा तस्करांवर कर्नाटक पोलिसांचे छापे

By admin | Published: February 22, 2016 12:01 AM2016-02-22T00:01:46+5:302016-02-22T00:01:46+5:30

महिला ताब्यात : दोन संशयित फरार

Karnataka police raids on Mirjat Ganja smugglers | मिरजेत गांजा तस्करांवर कर्नाटक पोलिसांचे छापे

मिरजेत गांजा तस्करांवर कर्नाटक पोलिसांचे छापे

Next

मिरज : कर्नाटकातील बिदर परिसरात गांजाचा मोठा साठा पकडून गांजा तस्करांच्या शोधासाठी कर्नाटक पोलिसांनी मिरजेत छापे टाकून एका महिलेस ताब्यात घेतले. गांजा तस्करी प्रकरणातील जुलेखा ऊर्फ जिल्ली व मुबारक हे दोघे फरार झाल्याची माहिती मिळाली.
मिरजेत मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री व तस्करी सुरू असून, मिरजेतून गोव्यासह अनेक ठिकाणी गांजा पाठविण्यात येतो. कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मिरजेत गांजाची आवक सुरू असून, रेल्वेस्थानक परिसर व खॉजा वसाहतीत गांजा तस्करांचे केंद्र आहे. चार दिवसांपूर्वी कर्नाटकातील बिदर येथे मिरजेत गांजा नेणाऱ्या तस्करांना पकडून त्यांच्याकडून गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला. हा गांजा मिरजेतील जुलेखा ऊर्फ जिल्ली या गांजा विक्री करणाऱ्या महिलेकडे नेण्यात येत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार कर्नाटक पोलीस मिरजेत दाखल झाले. सापळा रचून त्यांनी जिल्ली हिच्या घरावर छापा टाकला. मात्र, जिल्ली व तिचा मुलगा मुबारक हे फरार झाले होते. जुलेखा या महिलेस अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी यापूर्वी शिक्षा झाली आहे.
कर्नाटक पोलिसांनी जिल्ली हिची मुलगी मदीना हिला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. कर्नाटक पोलिसांच्या छाप्याबाबत माहिती नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. मिरज रेल्वेस्थानक परिसर व खॉजा वसाहत परिसरात गांजाच्या किरकोळ विक्रीसह अन्य राज्यात आयात-निर्यात राजरोस सुरू आहे. मात्र, गांजा तस्करी करणारे अद्याप स्थानिक पोलिसांना सापडलेले नाहीत.

Web Title: Karnataka police raids on Mirjat Ganja smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.