सांगली: विमानतळाच्या जागेप्रकरणी कवलापूर ग्रामपंचायत न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 12:23 PM2022-11-01T12:23:29+5:302022-11-01T12:23:51+5:30

शासनाने मूळ उद्देश बाजुला ठेवून जागा वर्ग केली, आता जागेचा व्यवहार केला आहे.

Kavalapur Gram Panchayat will go to the court regarding the airport site | सांगली: विमानतळाच्या जागेप्रकरणी कवलापूर ग्रामपंचायत न्यायालयात जाणार

सांगली: विमानतळाच्या जागेप्रकरणी कवलापूर ग्रामपंचायत न्यायालयात जाणार

googlenewsNext

बुधगाव : कवलापूर विमानतळाची जागा एका खासगी कंपनीला विकली गेली आहे. ही जागा विमानतळासाठी दिली होती. मात्र, शासनाने मूळ प्रकल्प न राबवता ही जागा एमआयडीसीला वर्ग करून जागेची विक्री केली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीच्यावतीने न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय कवलापूर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. तसेच याप्रकरणी विमानतळ जागा बचाव कृती समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे सरपंच सुषमा पाटील व ग्रामपंचायत सत्ताधारी गटनेते भानुदास पाटील सांगितले.

कवलापूर ग्रामपंचायतीची मासिक बैठक सोमवारी सरपंच सुषमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला ग्रामसेवक सचिन पाटील, उपसरपंच प्रमोद पाटील, सत्ताधारी पक्षाचे गटनेते, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य निवास पाटील, सौरभ पाटील, शरद पवळ, कुमार पाटील, सदस्या शुभांगी नलावडे, चंदाबाई ढवणे, उज्ज्वला गुंडे, वंदना मोहिते, विद्याताई माळी उपस्थित होते.
कवलापूर येथील विमानतळाची तब्बल १६० एकर जागा गुजरात येथील श्री श्रीष्टा या खासगी कंपनीला दिली गेली आहे.

ही जागा ग्रामपंचायतीला मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दा ग्रामपंचायत सदस्य शरद पवळ यांनी सभेत मांडला. यावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामपंचायत सत्ताधारी गटनेते भानुदास पाटील म्हणाले, कवलापुरात विमानतळ व्हावा, म्हणून ही जागा देण्यात आली होती. मात्र, शासनाने मूळ उद्देश बाजुला ठेवला. ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता ही जागा परस्पर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडे वर्ग केली.
शासनाने मूळ उद्देश बाजुला ठेवून जागा वर्ग केली, आता जागेचा व्यवहार केला आहे.

भविष्यात ग्रामपंचायतीला प्रकल्प राबविण्यासाठी जागा नाही. त्यामुळे या जागेचा व्यवहार रद्द व्हावा व जागा ग्रामपंचायतीला मिळावी म्हणून न्यायालयीन लढा लढू, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. उपसरपंच प्रमोद पाटील यांनी जागेसंदर्भात जागा बचाव कृती समितीची स्थापना करावी, अशी मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य निवास पाटील व माजी उपसरपंच सौरभ पाटील यांनीदेखील जागेसंदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. सरपंच सुषमा पाटील यांनी जागेच्या व्यवहाराविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात कवलापुरातील तज्ज्ञ व्यक्तिंना घेऊन विमानतळ जागा बचाव कृती समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Kavalapur Gram Panchayat will go to the court regarding the airport site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.