कवठेमहांकाळला दुकानगाळे भाडेवाढविरोधात ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:29+5:302021-02-27T04:35:29+5:30

गेले पंधरा दिवस झाले कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या दुकानगाळे वाढीव अनामत रक्कम प्रकरणाने शहरात वातावरण ढवळून निघाले आहे. मोर्चा, निवेदन, खासदार ...

Kavathemahankal passed a resolution against the increase in shop rent | कवठेमहांकाळला दुकानगाळे भाडेवाढविरोधात ठराव मंजूर

कवठेमहांकाळला दुकानगाळे भाडेवाढविरोधात ठराव मंजूर

Next

गेले पंधरा दिवस झाले कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या दुकानगाळे वाढीव अनामत रक्कम प्रकरणाने शहरात वातावरण ढवळून निघाले आहे. मोर्चा, निवेदन, खासदार संजयकाका पाटील यांची विनंती, आदी प्रक्रिया पार पडल्या.

शुक्रवारी नगरपंचायतीच्या मासिक सभेत १६ पैकी १४ नगरसेवक हजर होते. या सर्वांनीच या दुकानगाळ्यांची वाढीव अनामत रक्कम व भाडेवाढीविरोधात एकत्र येत याविरोधी ठराव मंजूर केला.

यानंतर प्रा. दादासाहेब ढेरे, भाजपचे नेते हायुम सावणूरकर, अनिल लोंढे, महावीर माने, नगरसेवक विशाल वाघमारे, रणजित घाडगे, अजम मकानदार, दयानंद सगरे, संजय कोठावळे यांच्यासह दुकानगाळेधारक, कार्यकर्ते यांनी एकत्रित येत पेढे भरवून आनंद साजरा केला.

चौकट

तक्रार करणार

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ संतोष मोरे म्हणाले की, वाढीव अनामत रकमेबाबत आम्ही थोडा विचार करून शिथिलता देऊ. परंतु जी भाडेवाढ रद्द करावी; कोरोनाकाळातील भाडे घेऊच नये असा ठराव केला आहे, त्या ठरावाविरोधात आपण प्रशासनाच्या वतीने नगरपंचायतीच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत.

Web Title: Kavathemahankal passed a resolution against the increase in shop rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.