Sangli: कवठेमहांकाळच्या तहसीलदार कार्यालयाचे रुप पालटले; परिसर बनला स्वच्छ, प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 01:30 PM2023-08-09T13:30:54+5:302023-08-09T13:41:48+5:30

महेश देसाई शिरढोण : 'सरकारी काम सहा महिने थांब' या वाकप्रचाराला कवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसे यांनी पूर्ण विराम देत ...

Kavthe Mahankal Tehsildar office changed; The area became clean, trying to improve the image | Sangli: कवठेमहांकाळच्या तहसीलदार कार्यालयाचे रुप पालटले; परिसर बनला स्वच्छ, प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

Sangli: कवठेमहांकाळच्या तहसीलदार कार्यालयाचे रुप पालटले; परिसर बनला स्वच्छ, प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

महेश देसाई

शिरढोण : 'सरकारी काम सहा महिने थांब' या वाकप्रचाराला कवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसे यांनी पूर्ण विराम देत तहसील कार्यालय येथे कार्यपद्धतीत बदल केल्याचे गत काही दिवसातच दिसून आले आहे. तहसीलदार कापसे यांनी गत काळात तहसील कार्यालयाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ अंतर्गतच नव्हे तर तहसीलचे बाह्यरुपही त्यांनी पालटून टाकले आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगाव येथील निकम वस्तीकडे जाणार रस्त्याचा निकम यांच्या भावकित वाद होता. गेले चार वर्षे हा दावा प्रलंबित होता. तहसीलदार कापसे यांनी तो काही दिवसातच निकाली काढला. तसेच मोरगाव येथील शेतकऱ्यांच्या वादात असलेल्या रस्त्यावर जाऊन त्या शेतकऱ्यांना दिला. यावेळी तेथील सर्व शेतकऱ्यांनी कापसे यांचे आभार मानले.

त्याचबरोबर तहसील कार्यालयच्या आवारात जप्त केलेले  ट्रक, ट्रॅक्टर,जीसीबी आदी. वाहनांची गजबज झाली होती. याठिकाणी भंगारबाजारासारखे चित्र झाले होते. तहसीलदार कापसे यांनी हा परिसर तात्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या. जप्त गाड्या शिस्तबद्ध लावून कार्यालयाच्या समोर वृक्ष लागवड केली. यामुळे सध्या परिसह अगदी स्वच्छ व सुदंर दिसू लागला आहे.

तहसीलदार कापसे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर काही दिवसातच तालुक्यातील सर्व तलाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चांगली शिस्त लावली. नागरिकांना कोणत्याही पद्धतीचे कामासाठी हेलपाटे घालून देऊ नये तात्काळ कामे करण्याचे आदेश दिले. तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालयात जाऊन कामाची पाहणी केली. यामुळे तलाठी कार्यालयातील कामे लवकरच मार्गी लागतील असे दिसून येते.

तहसील कार्यालयात पुरवठा शाखेतील शिधापत्रिका देण्यासाठी होणारी लूट, त्याचबरोबर विविध दाखल्यासाठी होणारी लूट,व अन्य काम तहसील कार्यालयातील होणारे यासाठी होणारी लूट या सर्व होणाऱ्या लुटीचा प्रश्न तहसीलदार अर्चना कापसे यांच्या कार्यकाळात थांबणार हे निश्चित आहे.
        

Web Title: Kavthe Mahankal Tehsildar office changed; The area became clean, trying to improve the image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली