कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूरचे सभापती पद खुले
By admin | Published: January 31, 2017 12:06 AM2017-01-31T00:06:29+5:302017-01-31T00:06:29+5:30
पंचायत समिती आरक्षण : जत, पलूस, कडेगाव महिलांसाठी
सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण प्रशासनाने सोमवारी जाहीर केले. यात कवठेमहांकाळ, आटपाडी आणि खानापूर पंचायत समित्यांचे सभापती पद खुले, तर जत, पलूस, कडेगाव खुल्या गटातील महिलांसाठी जाहीर झाले आहे. सभापती पद आरक्षण सोडत जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभापती आरक्षण सोडत झाली. यात कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर येथील सभापती पद खुले झाले. जत, पलूस आणि कडेगावचे खुल्या गटातील महिलांसाठी, शिराळा अनुसूचित जाती महिला, तासगाव, वाळवा नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर मिरजेचे सभापती पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
सोडतीच्या सुरुवातीला अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण मिरजेसाठी घोषित करण्यात आले. त्यावर अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी हरकत घेतली. २००२ च्या परिपत्रकानुसार चक्रानुक्रमानुसार आरक्षण काढण्यात यावे व लोकसंख्या गृहित धरण्यात यावी, अशी तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, २००२ ची तरतूद रद्द करण्यात आल्याचे व १९९७ पासूनचे आरक्षण बघून सोडत काढण्यात यावी, असे आदेश असल्याचे मुळीक यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे लगतच्या निवडणुकीतील आरक्षण लक्षात घेत अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण शिराळ्यासाठी जाहीर करण्यात आले.
वाळवा, तासगाव आणि मिरज सभापतिपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षणाची प्रक्रिया राबविण्यात आली. यातील एक सभापती पद महिलेसाठी राखीव होते. तासगावचे सभापती पद २०११ व २०१४ ला महिलेसाठी राखीव असल्याने आता ते नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुष व महिलांसाठी आरक्षित झाले, तर वाळव्याचेही आरक्षण याच गटासाठी जाहीर झाले. मिरज पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले. सभापती पद खुले झाल्याचे घोषित करताना प्रशासनाने बराचवेळ चर्चा केली. जेथे यापूर्वी महिला आरक्षण होते, ते पद खुले करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, तहसीलदार योगेश खरमाटे, सोनिया घुगे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पंचायत समितीआरक्षण
खानापूरसर्वसाधारण
आटपाडीसर्वसाधारण
कवठेमहांकाळसर्वसाधारण
जतसर्वसाधारण महिला
पलूससर्वसाधारण महिला
कडेगावसर्वसाधारण
महिलावाळवानागरिकांचा
मागास प्रवर्ग
तासगावनागरिकांचा
मागास प्रवर्ग
मिरजनागरिकांचा
मागास प्रवर्ग
महिला
शिराळाअनुसूचित
जाती महिला