संडे स्पेशलसाठी कवठेमहांकाळचा बुलडोझर मॅन डॉ. श्रीकर परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:24+5:302021-03-20T04:24:24+5:30

जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवाया करत डॉ. श्रीकर परदेशी या मराठमोळ्या अधिकाऱ्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. ...

Kavthemahankal's Bulldozer Man Dr. for the Sunday Special. Shrikar Pardeshi | संडे स्पेशलसाठी कवठेमहांकाळचा बुलडोझर मॅन डॉ. श्रीकर परदेशी

संडे स्पेशलसाठी कवठेमहांकाळचा बुलडोझर मॅन डॉ. श्रीकर परदेशी

googlenewsNext

जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवाया करत डॉ. श्रीकर परदेशी या मराठमोळ्या अधिकाऱ्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. इतकेच नव्हे तर खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनादेखील परदेशी यांच्या चोख कामगिरीने प्रभावित केले. त्यांची थेट दिल्लीमध्ये प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून नेमणूक केली.

केंद्रीय प्रशासनात मराठी अधिकाऱ्यांचा दबदबा निर्माण करणारे श्रीकर कवठेमहांकाळचे रहिवासी. वडील केशव वनविभागात अधिकारी असल्याने सतत बदल्या व्हायच्या, त्यामुळे श्रीकर यांचे शिक्षणही फिरत्या स्वरूपाचेच झाले. तीनही मुलांच्या शिक्षणावर आईचे विशेष लक्ष होते. श्रीकर यांनी एमबीबीएस व एमडीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. काहीकाळ वैद्यकीय प्रॅक्टिसही केली, पण प्रशासकीय सेवेचे आकर्षण कायम होते. २००१ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात पहिले तर देशात दहावे आले.

कोल्हापुरात अपर जिल्हाधिकारी, यवतमाळला जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला व नांदेडला जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्त, राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक, प्रधानमंत्री कार्यालयात संचालक आणि उपसचिव असा त्यांचा नेत्रदीपक प्रशासकीय प्रवास आहे. अर्थात या वेगवान प्रवासाला त्यांची धडाकेबाज कामगिरी कारणीभूत ठरली आहे. नांदेडमध्ये बोगस पट दाखवून शासनाने अनुदान हडपण्याचा वर्षानुवर्षे सुरू असणारा बिनबोभाट कारभार त्यांनी हाणून पाडला. पटपडताळणी काटेकोरपणे राबविली. शासनाचे कोट्यवधी रुपये वाचविले. पिंपरी-चिंचवडमध्ये धनदांडग्यांची वीस-वीस मजली इमारतींची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पिंपरी-चिंचवडकरांनी त्यांना बुलडोझर मॅन अशी पदवी बहाल केली. कॉपीमुक्त परीक्षा अभियान, यवतमाळ, नांदेड व अकोल्यातील जलसंधारण मोहीम, नागरिकांना सरकारी सेवांची माहिती देण्यासाठी सारथी हेल्पलाइन अशी त्यांची लक्षवेधी कामगिरी ठरली आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला आहे. चोख कामकाजाचा परदेशी पॅटर्न निर्माण करणारा हा अधिकारी आपल्या सांगलीचा आहे ही आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट.

Web Title: Kavthemahankal's Bulldozer Man Dr. for the Sunday Special. Shrikar Pardeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.