कवठेमहांकाळवर पाणी संकट

By admin | Published: March 7, 2017 11:07 PM2017-03-07T23:07:14+5:302017-03-07T23:07:14+5:30

सहा तलाव मृतसंचयाखाली : टँकर सुरू करण्याची मागणी

Kavtheteenth Water Crisis | कवठेमहांकाळवर पाणी संकट

कवठेमहांकाळवर पाणी संकट

Next

लखन घोरपडे-- देशिंग -कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा लघुप्रकल्प व एक मध्यम प्रकल्प तलावांपैकी सहा तलावांची पाणी पातळी मृतसंचयाखाली गेली आहे, तर पाच तलावांमध्ये केवळ चाळीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तालुक्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होणार आहे. काही गावांमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करण्याची मागणीही होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात दहा लघुप्रकल्प, तर एक मध्यम प्रकल्प तलाव आहेत. परंतु बसाप्पावाडी येथील मध्यम प्रकल्प तलावही सीलखाली आला आहे. सध्या तालुक्याला वरदान ठरलेली म्हैसाळ योजना सुरू आहे. परंतु या पाण्याने अद्याप तलाव भरलेले नाहीत.तर घोरपडी येथील तलावात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात आले होते; परंतु या तलावातही केवळ पंधरा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. रायवाडी, लांडगेवाडी, लंगरपेठ, कुची, दुधेभावी, बसाप्पावाडी हे तलाव सील कोट्याखाली गेले आहेत. या तलावाअंतर्गतच अनेक गावांतील पिण्याच्या पाणी योजना कार्यरत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने पाणी पातळीतही वेगाने घट होत आहे. विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला आहे. तालुक्यात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये द्राक्ष व ऊस शेती प्रामुख्याने केली जाते, परंतु कायमच दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्याला म्हैसाळ योजनेने चांगलाच आधार दिला आहे. परंतु या योजनेपासून काही गावे वंचित राहिली आहेत, तर घाटमाथ्यावरील सहा गावे म्हैसाळ व टेंभू या दोन्ही योजनांपासून वंचित राहिली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे.

५.६५
द. ल. घ. फू.
कुची - सीलखाली, रायवाडी- सीलखाली, लांडगेवाडी-सीलखाली, लंगरपेठ -सीलखाली, नांगोळे


८.४४
द. ल. घ. फू.,
दुधेभावी-सीलखाली, घोरपडी


२१.९९
द. ल. घ. फू., बोरगाव

२५.६७
द. ल. घ. फू.,
बंडगरवाडी बसाप्पावाडी - सीलखाली )


६.३२
द. ल. घ. फू.,
हरोली

Web Title: Kavtheteenth Water Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.