कवठेमहांकाळ नगरपंचायतीत काकांच्या वळचणीला सत्ताधारी- काका गट जोमात आणि सरकार गट कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:38 PM2017-10-09T22:38:11+5:302017-10-09T22:38:11+5:30

कवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी आणि टक्केवारीच्या लालसेपोटी नगरपंचायतीचे सत्ताधारी खा. संजयकाका पाटील यांच्या वळचणीला जाऊन बसल्याचे चित्र

Kawethamahankhal Nagapanchayat-Dakhaan - Kaka group Jomat and government group comat | कवठेमहांकाळ नगरपंचायतीत काकांच्या वळचणीला सत्ताधारी- काका गट जोमात आणि सरकार गट कोमात

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत काकांच्या वळचणीला सत्ताधारी- काका गट जोमात आणि सरकार गट कोमात

Next

अर्जुन कर्पे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी आणि टक्केवारीच्या लालसेपोटी नगरपंचायतीचे सत्ताधारी खा. संजयकाका पाटील यांच्या वळचणीला जाऊन बसल्याचे चित्र आहे. नगरपंचायतीमध्ये सगरे गट, आबा गट आणि खा. संजयकाका पाटील गट एकत्र आला असून, अजितराव घोरपडे गट बाजूला फेकला गेला आहे. नगरपंचायतीमध्ये आबा व सगरे गटामुळे ‘काका गट जोमात आणि सरकार गट कोमात’ अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

दिवंगत आर. आर. पाटील आबा, दिवंगत विजय सगरे आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) गटाची नगरपंचायतीमध्ये सत्ता येऊन या महिन्यात वर्ष पूर्ण होत आहे. परंतु वर्षभराच्या काळात सत्ताधाºयांनी केलेल्या कारभारात विकासापेक्षा कुरघोड्यांचीच चर्चा अधिक रंगली. पहिल्या महिन्यापासूनच आबा गट व सगरे गटात कामांवरून व निधीवरून जुंपली.
निवडणुकीवेळी आबा गटाला मते देण्यासाठी व निवडून आणण्यासाठी जनतेने जिवाचे रान केले, मोठा संघर्ष केला. हाणामारीचे प्रकारही घडले. परंतु याच आबा गटातील स्वच्छ प्रतिमा म्हणून निवडून आलेले प्रमुख पदाधिकारी आज टक्केवारीतील व विकास कामातील मलिदा खाण्यात अग्रेसर झाले आहेत, असे आता जनता म्हणत असल्याचे चित्र आहे.

विविध विकास कामांच्या ठेकेदारांना बंद खोलीत घेऊन मॅनेज करणे, टक्केवारी ठरवून घेणे, अन्यथा बिले लांबविणे, धनादेशावर सह्या न करणे असे प्रकार गेले सहा महिने सुरु असल्याची चर्चा शहरातील जनतेत व सुशिक्षित वर्गात सुरू आहे.
काका गटाच्या राजकारणातील शिलेदारांनी नगरपंचायतीमध्ये काका गटाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काही डाव खेळले, ते यशस्वी झाले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. लवकरच नगरपंचायतीमध्ये सत्तेचा नवा राजकीय डाव मांडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घोरपडे गट बाजूला
ज्या अजितराव घोरपडेंच्या गटावर व जिवावर आबा गट सत्तेत आला, त्या घोरपडे गटालाच नगरपंचायतीमध्ये बाजूला सारण्यात आले आहे.मुख्याधिकारी बदला!विकास कामात टक्केवारी, मलिदा खाता येईना, म्हणूनच अडसर ठरणारे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांची बदली करण्यासाठी नगरपंचायतींचे काही पदाधिकारी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन बसल्याची जोरदार चर्चा आता शहरातील जनतेत सुरु झाली आहे.

Web Title: Kawethamahankhal Nagapanchayat-Dakhaan - Kaka group Jomat and government group comat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.