कोरोनाला हरविण्यासाठी हसत राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:45+5:302021-06-05T04:19:45+5:30
सांगली : कोरोना हा रोग शरीरात कमी आणि मनात जास्त आहे. यामुळे कोरोनाची भीती सर्वांना वाटत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी ...
सांगली : कोरोना हा रोग शरीरात कमी आणि मनात जास्त आहे. यामुळे कोरोनाची भीती सर्वांना वाटत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सतत आनंदी राहून हसत राहणे महत्त्वाचे असल्याचे मत व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
इनाम धामणी येथील कोविड सेंटरमध्ये 'आनंदी जीवनासाठी हसा' या विषयावर ते बोलत होते. हंकारे म्हणाले की, कोरोनाबाबत अनाठायी भीती मनात बाळगू नका. स्वतःशी आत्मसंवाद साधत स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. नातेवाईक, मित्र परिवार यांनी कोरोनाग्रस्तांना सातत्याने धीर दिला पाहिजे. योग्य काळजी घेतल्यास कोरोना निश्चितपणे बरा होतो. त्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. मन व चेहरा सतत प्रसन्न ठेवा. या संकटकाळावर मोठ्या जिद्दीने चालून जावा, विजय आपलाच होणार आणि आपण कोरोनामुक्त होणारच, असा ठाम विश्वास वसंत हंकारे यांनी कोरोनाग्रस्तांना दिला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, कोविड सेंटरचे प्रवर्तक महावीर पाटील उपस्थित होते.