खाडेंना टोचू लागले कमळाचे काटे!

By Admin | Published: December 5, 2014 10:40 PM2014-12-05T22:40:56+5:302014-12-05T23:34:10+5:30

भाजपमध्ये वाद : मंत्रिपदाची कापाकापी जोमात; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; उलट-सुलट चर्चा

Khadena began toked lotus leaflet! | खाडेंना टोचू लागले कमळाचे काटे!

खाडेंना टोचू लागले कमळाचे काटे!

googlenewsNext

सदानंद औंधे- मिरज -राज्य मंत्रिमंडळाच्या आज (शुक्रवारी) झालेल्या विस्तारात मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना स्थान मिळाले नसल्याने समर्थक-कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जिल्ह्यात मंत्रिपदावरून भाजप नेत्यांमध्ये दोन गट पडल्याने मंत्रिपदावर वर्णी लावण्यासाठी एकमेकांचे पत्ते कट कापण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याने जिल्ह्यातील भाजपचे मंत्री अद्याप निश्चित झालेले नाहीत.
आ. खाडे हे भाजपचे जिल्ह्यातील पहिले आमदार. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिरजेतून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासह, मिरजेतून दोन वेळा मताधिक्याने विजय मिळविणारे आ. खाडे नवीन सरकारमध्ये पालकमंत्री होणार असल्याच्या घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांतून झाल्या होत्या. आ. खाडे यांनी मंत्रीपदासाठी जोर लावल्याने भाजप सरकार स्थापनेनंतर त्यांचे मंत्रिमंडळात स्थान निश्चित होते. मात्र कोठेतरी माशी शिंकली व त्यांना पुढीलवेळी मंत्रीपदी वर्णी लावण्याचे आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे चार आमदार निवडून आले. चौघांनीही पक्षनेतृत्वाकडे मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर त्यापैकी खाडे व शिवाजीराव नाईक यांनाच वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाला. मात्र मंत्रिमंडळात दोघांचीही वर्णी लावण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. जिल्ह्यात मंत्रिपदी कोणाची निवड व्हावी, यासाठी भाजपअंतर्गत जोरदार राजकारण सुरू असून विरोधी गटाच्या मंत्रिपदाचा पत्ता कापण्याच्या प्रयत्नापर्यंत या गटांची मजल गेल्याची चर्चा आहे. रखडलेली भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आ. खाडे व आ. नाईक यांची निवड निश्चित असल्याने, त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारातही दोघांना हुलकावणी मिळाली आहे.
भाजपअंतर्गत वादामुळेच जिल्ह्याचा मंत्रिमंडळात समावेश होत नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. खाडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने भाजपमध्ये जुन्या-नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा एकदा निराशा झाल्याने खाडे समर्थक संतप्त आहेत. भाजपच्या जिल्ह्यातील काही नेत्यांनी नाईक यांच्या नावासाठी आग्रह धरून खाडे यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याने, त्यांचे समर्थक पक्षातील विरोधकांबद्दल आक्रमक झाले आहेत. मंत्रिपदाच्या हुलकावणीमुळे भाजपमध्ये दोन गटातील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे.
पक्षांतर्गत विरोध कितीही झाला तरी, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान निश्चित असल्याचे सांगत खाडे समर्थकांची समजूत काढण्यात येत आहे.


पक्षाने मला न मागता भरपूर दिले आहे. मात्र जनतेची व कार्यकर्त्यांची मंत्रिपदाची मागणी आहे. वरिष्ठ नेत्यांनी आश्वासन दिले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात माझा समावेश का झाला नाही, याचे कारण माहीत नाही. माझ्याविरोधात कारवाया केल्याचा मी कोणावर आरोप करणार नाही. मात्र मला मंत्रीपद द्यायचे की नाही, याचा पक्षनेतेचे निर्णय घेतील.
- सुरेश खाडे, आमदार, मिरज



संजय पाटील यांची संदिग्ध भूमिका
खा. संजय पाटील यांनी आ. खाडे यांच्या मंत्रिपदाबाबत संदिग्ध भूमिका घेतल्याचा खाडे समर्थकांचा आरोप आहे, तर मिरजेतील काही जुने भाजप नेते, खाडे यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी झारीतील शुक्राचार्याची भूमिका बजावत असल्याच्या संशयाने भाजप समर्थकांनी संबंधित नेत्याच्या घरात जाऊन गोंधळ घातल्याची चर्चा होती. खाडे यांनी पक्षात पद मिळवून दिलेले नेतेच त्यांच्याविरोधात कारवाया करीत असल्याचा समर्थकांचा आक्षेप आहे.

Web Title: Khadena began toked lotus leaflet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.