खैरावला दोन चिमुकल्यांसह महिलेची विहिरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:29 AM2021-05-27T04:29:32+5:302021-05-27T04:29:32+5:30

खैराव (ता. जत) येथील याच विहिरीत महिलेने दोन मुलांसह उडी घेतली. लोकमत न्यूज नेटवर्क संख : खैराव (ता. जत) ...

Khairavala jumps into the woman's well with two kisses | खैरावला दोन चिमुकल्यांसह महिलेची विहिरीत उडी

खैरावला दोन चिमुकल्यांसह महिलेची विहिरीत उडी

googlenewsNext

खैराव (ता. जत) येथील याच विहिरीत महिलेने दोन मुलांसह उडी घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : खैराव (ता. जत) येथे महिलेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली. त्यात दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला, पण महिलेला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. रूपा शंकर बुरुंंगुले (वय ३५) असे महिलेचे नाव आहे, तर समर्थ (वय नऊ महिने) आणि सुप्रिया (चार वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता घडली. या घटनेमागचे कारण समजू शकले नाही.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सांगली-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील खैराव येथेे गावापासून पूर्वेला अडीच किलोमीटरवर पडोकरवाडीच्या सीमेलगत शंकर हरीबा बुरंगुले हे पत्नी सुप्रिया व दोन मुलांसह राहतात. शंकर बुरुंगुले मंगळवेढा तालुक्यातील लोणार या गावचे आहेत. त्यांची जमीन खैराव हद्दीत आहे. पत्नी रूपालीचा दुसरा विवाह झाला होता. या दोघांना समर्थ व सुप्रिया अशी दोन मुले होती. घरातील किरकोळ वादातून रूपाली बुधवारी सकाळी अकरा वाजता घरातून सुप्रिया व समर्थ या मुलांना घेऊन बाहेर पडल्या. त्या तडक शेतातील विहिरीकडे गेल्या व त्यांनी मुलांसह विहिरीत उडी मारली. उडी मारताना हातातून दोन्ही मुले निसटल्याने दोघांचा मुत्यू झाला, तर रूपाली यांच्या हातात मोटारीच्या पाईपला बांधलेली दोरी आली. ती धरून त्या राहिल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना पाहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना विहिरीतून वर काढले. आईच्या रागापोटी दोन निष्पाप मुलांना जीव गमवावा लागला.

सरपंच राजाराम घुटुगडे, पोलीसपाटील कांताबाई पाटील यांनी जत पोलिसांना माहिती दिली. यु. एन. घोडके, गोपाल भोसले, संजय माने, समीर मुल्ला, व्ही. एम. मुजावर, एन. डी. गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या मुलांनाही विहिरीतून बाहेर काढून जत ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन केले. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मनोरुग्ण असल्याचा परिणाम

काही दिवसांपासून रूपाली मनोरुग्ण बनल्या होत्या. किरकोळ घटनेवरून त्या घरात वाद घालत असत. त्यातूनच आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Web Title: Khairavala jumps into the woman's well with two kisses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.