खानापूर आरोग्य केंद्रामुळे कुटुंबाला धीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:25 AM2021-01-22T04:25:21+5:302021-01-22T04:25:21+5:30
बुधवारी येथील दीपाली दत्तात्रय मंडले यांना प्रसूतीसाठी कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी बाळ व मातेला प्रसूतीदरम्यान धोका असल्याचे ...
बुधवारी येथील दीपाली दत्तात्रय मंडले यांना प्रसूतीसाठी कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी बाळ व मातेला प्रसूतीदरम्यान धोका असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. प्रसूतीसाठी सांगलीला नेण्याचा सल्ला मिळाला. प्रसूतीसाठी मोठा खर्च येणार व धोका असल्यामुळे भांबावलेल्या मंडले कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते विजय भगत यांनी धीर देत राष्ट्रवादीचे युवा नेते सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर सचिन शिंदे यांनी कुटुंबाला मानसिक आधार देवून प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्याचा सल्ला दिला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना शिंदे यांनी परिस्थितीची माहिती देवून प्रसूती करण्याची विनंती केली. यांनतर प्रसूती करणाऱ्या परिचारिका सुषमा माने, वंदना पुजारी यांनी धोका पत्करून मंडले यांची प्रसूती सुलभरित्या केली. यामुळे मंडले कुटुंब भारावून गेले. त्यांनी मोठ्या संकटातून वाचल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी सचिन शिंदे, विजय भगत, शाहरुख पठाण, गणेश भगत, महेंद्र मोहिते, नामदेव जाधव, आरोग्यसेविका सुषमा काळभोर, सुरुबाई बुरुकले, तन्वी कुलकर्णी उपस्थित होते.
फोटो-२१खानापूर१
फोटो ओळ : खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी सुषमा माने यांचा जयसिंग मंडले यांनी सत्कार केला. यावेळी सचिन शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.