काँगे्रस-राष्ट्रवादीला खोत यांचा नवा धक्का !

By admin | Published: May 11, 2017 11:10 PM2017-05-11T23:10:59+5:302017-05-11T23:10:59+5:30

काँगे्रस-राष्ट्रवादीला खोत यांचा नवा धक्का !

Khot's new push to Congres-Nationalist | काँगे्रस-राष्ट्रवादीला खोत यांचा नवा धक्का !

काँगे्रस-राष्ट्रवादीला खोत यांचा नवा धक्का !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘शासन तृणधान्य व कडधान्ये नियमनमुक्त करणार आहे. मागे जशी विरोधकांनी ओरड केली तशीच ते या निर्णयानंतरही करतील याची मला खात्री आहे. विरोधकांना शेतकऱ्यांचा नाही तर व्यापाऱ्यांचा कळवळा आहे,’ अशी टीका खोत यांनी केली.
‘कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करायला हवे, या हेतूने सिमेंट काँक्रीटचे बंधारे बांधण्याचे काम आमचा विभाग करत आहे, ती कामे आता कृषी विभाग करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील माझा हा निर्णय मान्य केला आहे,’ असे स्पष्टीकरण राज्याचे कृषी व पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत केले.
गुरुवारी मंत्री खोत स्वत: जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत भोसरे, ता. खटाव येथे श्रमदान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दृष्टीने शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मंत्री खोत यांनी येथील विश्रामगृहावर बुधवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली.
मंत्री खोत यांनी विरोधकांवरही टीकास्त्र झोडले. माझ्याकडे पणन खाते आल्यानंतर भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतकरी विक्री व्यवस्थेत पुढे आला. बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या लुटण्याचे अड्डे आहेत. माझ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करणारी यंत्रणा अडचणीत आली. आज जे शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचा आव आणत आहेत. तीच मंडळी आडतदार, व्यापारी यांना सोबत घेऊन सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. १९६३ पूर्वी कुठे बाजार समित्या होत्या. तरी देखील खाल्यांच्या माध्यमातून शेतकरी आपला माल विकत होते. शेतकऱ्यांना मालाच्या विक्रीचे स्वातंत्र्य होते. आता तीच व्यवस्था शासन आणणार आहे.
रोहिणी नक्षत्रात शासनातर्फे उन्नत शेती अभियान राबविले जाणार आहे. कोकणातून पेरणी दौरा सुरू करणार आहे. राज्यात सर्वत्र जाऊन पेरणी करणार आहे. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत पेरणी करतील. हवामान आधारित स्वयंचलित केंद्र प्रत्येक महसूलच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. गारपीट वादळ याची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळू शकणार आहे.
शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी इथून पुढचा काळ काम करणार आहे. साखळी वेअर हाउस उभारून शेतकऱ्यांच्या मालाला दर वाढेपर्यंत साठवणुकीची व्यवस्था करणार आहे.
शेतमालाला कर लावण्याचे मत
शेतमालाला कर लावावा या मताशी आपण सहमत असल्याचे मंत्री खोत म्हणाले. कर लावल्याशिवाय या व्यवसायातील नफा-तोटा पुढे येणार नाही. शेती हा खात्रीने तोट्यातील व्यवसाय आहे, त्यामुळे तोट्यातील व्यवसायाला कर लावता येणार नाही. हे स्पष्टपणे पुढे येईल, असेही खोत यांनी सांगितले.
रघुनाथदादांवर टीका करणे टाळले
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता खोत यांनी कोणतीही टीका करणे टाळले. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आलो आहोत मार्ग वेगळे असले तरी सर्वांचा हेतू एकच आहे. रघुनाथदादा, खासदार राजू शेट्टी, शंकर गोडसे यांनी शेतकरी चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य दिल्याचे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

Web Title: Khot's new push to Congres-Nationalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.