नगरसेवकाच्या घरात घुसून खुनीहल्ला

By Admin | Published: October 4, 2014 11:59 PM2014-10-04T23:59:40+5:302014-10-04T23:59:40+5:30

इस्लामपुरातील प्रकार : मोमीन मोहल्ल्यात दहशत

Khushihallah entered the house of the corporator | नगरसेवकाच्या घरात घुसून खुनीहल्ला

नगरसेवकाच्या घरात घुसून खुनीहल्ला

googlenewsNext

इस्लामपूर : शहरातील अकबर मोहल्ला परिसरात राहणाऱ्या राष्ट्रवादीचे नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्या घरात घुसून तिघांनी चाकू, लोखंडी गज व काठीने केलेल्या हल्ल्यात एका महिलेसह तिघे जखमी झाले. पैसे देण्यासाठी मध्यस्थी करून ते न दिल्याच्या कारणातून शुक्रवारी दुपारी खुनीहल्ला झाला. या चाकूहल्ल्यात सौ. आयेशा जाकीर पुणेकर (वय ४०) यांच्या डाव्या हातावर चाकूचा वार बसला असून नगरसेवक पिरअली पुणेकर, रमीजा आशपाक पुणेकर, जरीना पिरअली पुणेकर यांनाही मारहाण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शकील हारुण गोलंदाज, सुहेल रफीक बारस्कर व एका अनोळखीविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. शुक्रवारी दुपारी तिघेजण पुणेकर यांच्या घरात घुसले. तेथे त्यांनी जहॉँगीर महाब्री यांच्या पैशात मध्यस्थी केल्यानुसार ते पैसे दे, अशी मागणी करीत लोखंडी गज व काठीने पुणेकर यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी घरातील महिला भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्या. त्यामध्ये सर्वांना मारहाण झाली. त्यानंतर शकील गोलंदाज याने चाकूचा वार आयेशा पुणेकर यांच्या डाव्या हातावर केला. यामध्ये त्या रक्तबंबाळ झाल्या. या हल्ल्यानंतर तिघांनी तेथून पलायन केले. याप्रकरणी तिघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास मोमीन मोहल्ल्यातील पिरअली पुणेकर यांच्या संपर्क कार्यालयात शकील गोलंदाज, सुहेल बारस्कर व शाहीद सुतार अशा तिघांनी घुसून लोखंडी गजाने कार्यालयातील काचांचा चुराडा केला. संगणकही फोडून टाकला. या घटनेने या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोरांनी पोबारा केला होता. पुणेकर यांच्या भाच्याने कार्यालयातील तोडफोड प्रकरणाची फिर्याद दिली. (प्रतिनिधी) रिव्हॉल्व्हरने गोळी घालण्याची धमकी मोमीन मोहल्ल्यातील नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करताना शकील गोलंदाज याने आपल्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून कुठे आहे पिऱ्या, सांग नाही तर तुला गोळी घालीन. त्याला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून कार्यालयातील सगणक, टेबलाची लोखंडी गजाने नासधूस केली.

Web Title: Khushihallah entered the house of the corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.