सोशल मीडियावर ओळख झाली, अल्पवयीन मुलीचे अपहरण केलं अन् बलात्कारानंतर गळा कापला; सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 12:42 PM2023-06-03T12:42:28+5:302023-06-03T12:42:49+5:30

संशयित विवाहित, पत्नी सोडून गेली

Kidnapped a minor girl and slit her throat after rape in Sangli | सोशल मीडियावर ओळख झाली, अल्पवयीन मुलीचे अपहरण केलं अन् बलात्कारानंतर गळा कापला; सांगलीतील घटना

सोशल मीडियावर ओळख झाली, अल्पवयीन मुलीचे अपहरण केलं अन् बलात्कारानंतर गळा कापला; सांगलीतील घटना

googlenewsNext

मिरज : सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मिरजेत आणल्यानंतर बलात्कार करून गळा कापून खुनाचा प्रयत्न करण्याचा शुक्रवारी प्रकार घडला. याप्रकरणी प्रसाद शिवाजी मोतुगडे (माळी) (वय २०, रा. ब्राम्हणपुरी, मिरज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. येथील ब्राह्मणपुरीत ही घटना घडली. शहर पोलिसात प्रसाद मोतुगडे याच्याविरुद्ध बलात्कार, खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरारी झाला आहे.

सांगली शहरातील अल्पवयीन मुलीची प्रसाद मोतुगडे याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दि. ३० मे रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रसादने सांगलीत रिक्षातून जाऊन तिच्या घराजवळून तिचे अपहरण केले. तिला मिरजेतील ब्राम्हणपुरी परिसरात भाड्याने घेतलेल्या खोलीत नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण उजेडात येऊ नये, यासाठी त्याने तिच्या उजव्या हाताची नस कापून व गळ्यावर कटरने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तिला तेथेच रक्ताच्या थारोळ्यात टाकून प्रसाद मोतुगडेने घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी मुलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

संशयित विवाहित, पत्नी सोडून गेली

अपहरण, बलात्कार व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिने प्रसाद मोतुगडे याच्याविरुद्ध शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. तो विवाहित असून त्याच्या व्यसनामुळे त्याची पत्नी सोडून गेली आहे.

Web Title: Kidnapped a minor girl and slit her throat after rape in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.