प्रेमीयुगुलाच्या पलायनानंतर मुलाच्या आईचे अपहरण : इस्लामपूर माणिकवाडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:49 PM2017-11-23T23:49:34+5:302017-11-23T23:50:36+5:30

इस्लामपूर : माणिकवाडी (ता. वाळवा) येथील सज्ञान प्रेमीयुगुलाने पलायन केल्यानंतर, त्यातील युवतीस पळवून नेल्याचा राग मनात धरुन युवतीच्या मामाने यातील मुलाच्या आईचे अपहरण करुन तिला काळमवाडी येथील सुळकीच्या डोंगरावर

 Kidnapping of mother after son's escape: Islampur Manikwadi type | प्रेमीयुगुलाच्या पलायनानंतर मुलाच्या आईचे अपहरण : इस्लामपूर माणिकवाडीतील प्रकार

प्रेमीयुगुलाच्या पलायनानंतर मुलाच्या आईचे अपहरण : इस्लामपूर माणिकवाडीतील प्रकार

Next

इस्लामपूर : माणिकवाडी (ता. वाळवा) येथील सज्ञान प्रेमीयुगुलाने पलायन केल्यानंतर, त्यातील युवतीस पळवून नेल्याचा राग मनात धरुन युवतीच्या मामाने यातील मुलाच्या आईचे अपहरण करुन तिला काळमवाडी येथील सुळकीच्या डोंगरावर नेऊन गजाने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली. या नाट्यमय घडामोडीत मुलाच्या नातेवाईकांनी मुलीच्या कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील मामाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुलीच्या मामाविरुद्ध पोलिसांनी महिलेच्या अपहरणाविरुध्द मारहाण करण्याचा गुन्हा नोंद केला आहे. अपहरणातील चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी अपहरण झालेल्या सौ. यशोदा दिलीप शिंदे (वय ४८, रा. माणिकवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

यशोदा शिंदे यांचा २७ वर्षीय मुलगा आणि गावातीलच २३ वर्षीय मुलीने २२ नोव्हेंबरच्या पहाटे पलायन केले. त्याचदिवशी रात्री दहाच्या सुमारास यशोदा शिंदे पती आणि दुसरा मुलगा प्रल्हाद यांच्यासमवेत घरी होत्या. मुलीचे चुलते आणि मामा त्यांच्या घरी आले. दिलीप शिंदे व त्यांचा मुलगा प्रल्हाद याला सोबत घेऊन ते निघून गेले. त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास मुलीचा मामा पुन्हा शिंदे यांच्या घरी आला व त्याने यशोदा शिंदे यांना, माझी भाची व तुझा मुलगा कोठे आहे ते सांग, असे म्हणत शिवीगाळ करुन, भाची मिळत नाही तोपर्यंत तुला सोडत नाही, असे ठणकावत यशोदा शिंदे यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. तेथून धमकी आणि दमदाटी करतच डिग्रज येथे नेले. माझी भाची कोठे आहे ते सांग, नाही तर तुला गाडीखाली घालून मारतो, अशी धमकी दिली.

रात्रभर शिंदे यांना त्याने वाहनातच कोंडून ठेवले.दुसºयादिवशी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता यशोदा शिंदे यांना घेऊन मुलीचा मामा काळमवाडीतील सुळकीच्या डोंगरावर आला. तेथे त्याने लोखंडी गजाने सौ. शिंदे यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या हाताची बोटे मोडली. यावेळी त्यांनी आरडाओरडा सुरु ठेवला होता. त्याचवेळी तेथे शिंदे यांचा मुलगा प्रल्हाद, पुतण्या सयाजी व इतर नातेवाईक आले. प्रल्हादने मुलीच्या मामाला मारहाणीचा जाब विचारल्यावर, त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला पकडून घटनेची पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने काळमवाडी येथे जाऊन मुलीच्या मामाला वाहनासह ताब्यात घेतले.

रात्रभर वाहनात कोंडले
यशोदा शिंदे यांना, माझी भाची व तुझा मुलगा कोठे आहे ते सांग, असे म्हणत शिवीगाळ करुन, भाची मिळत नाही तोपर्यंत तुला सोडत नाही, असे ठणकावत यशोदा शिंदे यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. तेथून धमकी आणि दमदाटी करतच डिग्रज येथे नेले. माझी भाची कोठे आहे ते सांग, नाही तर तुला गाडीखाली घालून मारतो, अशी धमकी दिली. रात्रभर शिंदे यांना त्याने वाहनातच कोंडून ठेवले.दुसºयादिवशी यशोदा शिंदे यांना घेऊन मुलीचा मामा काळमवाडीतील सुळकीच्या डोंगरावर आला. तेथे त्याने लोखंडी गजाने सौ. शिंदे यांना मारहाण केली.

Web Title:  Kidnapping of mother after son's escape: Islampur Manikwadi type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.