कडेगावात कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:53 AM2017-10-24T11:53:50+5:302017-10-24T11:57:15+5:30
कडेगाव शहरात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांनी धुडगूस घातला आहे. येथील बुधवार पेठेत खाऊ आणण्यासाठी दुकानात गेलेल्या श्री शहाजी जाधव (वय ४) या बालकावर तीन कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडले. यामध्ये हे बालक गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी सांगली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कडेगाव,दि. २४ : कडेगाव शहरात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांनी धुडगूस घातला आहे. येथील बुधवार पेठेत खाऊ आणण्यासाठी दुकानात गेलेल्या श्री शहाजी जाधव (वय ४) या बालकावर तीन कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडले. यामध्ये हे बालक गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी सांगली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कडेगावात गेल्या अनेक दिवसांपासून कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सोमवारी सकाळी चार वर्षाचा श्री खाऊ आणण्यासाठी घराजवळच्या दुकानात निघाला होता.
घरापासून थोड्याच अंतरावर अचानक त्याच्यावर तीन कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्याच्या पायाला, डोक्याला, पाठीला, दोन्ही हातांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. जवळच असलेल्या तरुणांनी तात्काळ त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.
जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतली दखल
जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांना दिले आहेत. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व कर्मचाºयांनी मोकाट कुत्री पकडण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.