कवठेमहांकाळ तालुक्यात रस्त्यातील खड्डे जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:48+5:302021-09-25T04:26:48+5:30
फोटो ओळी : कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव यल्लमा मंदिर ते कुकटोळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महेश देसाई शिरढोण ...
फोटो ओळी : कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव यल्लमा मंदिर ते कुकटोळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
महेश देसाई
शिरढोण : कवठेमहंकाळ तालुक्यातील विविध गावांमध्ये रस्त्यावर खड्ड्यांचे; तर रस्त्याकडेला झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शिरढोण ते मळणगाव रस्ता, कवठेमहांकाळ शहरातील विद्यानगर परिसरात जाणारा रस्ता, हिंगणगाव ते कुकटोळी रस्ता, अग्रण धुळगाव ते लोणारवाडी आदी रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच जावे लागते. हिंगणगाव यल्लमा मंदिर ते कुकटोळी गावापर्यंत जाणारा रस्ता अगदी निकृष्ठ दर्जाचा आहे.
खड्ड्यांबरोबरच रस्त्याकडेला बल्लारी आणि झुडपांचे साम्राज्य वाढले आहे. झुडपांमुळे समोरून येणारे वाहनदेखील दिसत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत.
चौकट
आंदोलन हाच पर्याय
कवठेमहांकाळ तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याची दखल घेऊन प्रशासनाने यावर मार्ग काढावा अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
240921\img20210320121524.jpg
फोटो ओळी:- कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव यल्लमा मंदिर ते कुकटोळी ला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे.