कीर्ती शिलेदार यांना ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान’ पुरस्कार जाहीर

By Admin | Published: November 4, 2016 06:19 PM2016-11-04T18:19:53+5:302016-11-04T18:19:53+5:30

संगीत व नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया व्यक्तींना दरवर्षी देण्यात येणारा ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान’ पुरस्कार यंदा संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका

Kirti Shiledar has been honored with 'Natacharya Govind Ballal Deewal Award' award | कीर्ती शिलेदार यांना ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान’ पुरस्कार जाहीर

कीर्ती शिलेदार यांना ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान’ पुरस्कार जाहीर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 04  - संगीत व नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया व्यक्तींना दरवर्षी देण्यात येणारा ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान’ पुरस्कार यंदा संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना जाहीर झाला आहे. 
रंगभूमी दिनानिमित्त दरवर्षी येथील देवल स्मारक मंदिरच्यावतीने हा सन्मान पुरस्कार देण्यात येतो. रविवार दि. १३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते हा सन्मान शिलेदार यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. 
देवल स्मारक मंदिरच्यावतीने १९९८ पासून संगीत व नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया कलाकारांना देवल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत हा पुरस्कार भालचंद्र पेंढारकर, जयमाला शिलेदार, प्रसाद सावकार, शरद गोखले, मास्टर अविनाश, अरविंद पिळगावकर, श्रीमती फैयाज आदींना प्रदान करण्यात आला आहे. 
यंदा सन्मान प्राप्त झालेल्या कीर्ती शिलेदार यांनी २४ संगीत नाटकांतून भूमिका केलेल्या आहेत. ‘संगीत शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, कान्होपात्रा, मृच्छककटीक, द्रौपदी’ आदी नाटकांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. तरूण कलाकारांना वाव मिळावा म्हणून त्यांनी संगीत नाट्य सेवा ट्रस्टची स्थापना केली आहे.
रविवार दि. १३ नोव्हेंबरला लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे होणाºया कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते हा पुरस्कार शिलेदार यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

Web Title: Kirti Shiledar has been honored with 'Natacharya Govind Ballal Deewal Award' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.