कोल्हापुरातून उद्यापासून किसान रेल्वे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:28 PM2020-08-20T17:28:58+5:302020-08-20T17:30:36+5:30
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने सतरा वॅगन्सची किसान रेल सुरु केली आहे. उद्या, शुक्रवारपासून (दि. २१) आठवड्यातून एकदा ती धावेल.
सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने सतरा वॅगन्सची किसान रेल सुरु केली आहे. उद्या, शुक्रवारपासून (दि. २१) आठवड्यातून एकदा ती धावेल.
पाच वॅगन्सची गाडी क्रमांक ००१०९ ही कोल्हापुरातून मनमाडपर्यंत धावेल. तेथे देवळाली-मुजफ्फरपूर किसान रेल्वेला ती जोडली जाईल. परतताना ००११० या क्रमांकाने मनमाडमध्ये वेगळी होऊन कोल्हापूरला येईल. या गाडीला मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड व अहमदनगर हे थांबे आहेत.
पुढेदेखील जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खंडवा, इटारसी, पिपरिया आदी स्थानकांवर थांबणार आहे. तिला पाच वॅगन्स कोल्हापुरातून व दोन वॅगन्स दौंडमधून जोडल्या जातील. या गाडीला एकूण १७ वॅगन्स आहेत. देवळाली-मुजफ्फरपूर हा तिचा मूळचा प्रवास आहे. कोल्हापुरातून निघालेली किसान रेल मनमाडमध्ये तिला जोडली जाईल.