सांगलीतील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक किशोर पंडीत यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 06:03 PM2020-11-20T18:03:30+5:302020-11-20T18:04:42+5:30
sangli, sangli सांगली येथील अनंत गणेश पंडित सराफ पेढीचे किशोर अनंत पंडीत (वय ६१) यांचे शुक्रवारी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, फोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
सांगली : येथील अनंत गणेश पंडित सराफ पेढीचे किशोर अनंत पंडीत (वय ६१) यांचे शुक्रवारी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, फोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
किशोर पंडीत यांना दुपारी बाराच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पण वाटेतच त्यांची प्राणज्योत माळविली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला. जिल्हा सराफ असोसिएशनने सर्व व्यवगार बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंडित हे गेली १५ वर्षे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक होते.
महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णालंकार फेडरेशनचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. जिल्हा सराफ असोसिएशनचे मार्गदर्शक, टिळक स्मारक मंदिरचे विश्वस्तपदी त्यांनी काम पाहिले होते.