सांगली लोकसभेतील आजपर्यंतचे खासदार, जाणून घ्या एका क्लिकवर
By हणमंत पाटील | Published: March 28, 2024 06:32 PM2024-03-28T18:32:41+5:302024-03-28T18:37:21+5:30
१६ पैकी ११ लोकसभा निवडणुकीत म्हणजे १९८० ते २००९ या काळात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने प्रतिनिधीत्व केले
सांगली : सांगली जिल्हा पूर्वी दक्षिण सातारा म्हणून ओळखला जात होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक १९५२ साली झाली. त्यावेळी कॉंग्रेसचे व्यंकटराव पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे बाळासाहेब पाटील विजयी झाले.
१९५७ चा अपवाद वगळता १९५२ ते २००९ या काळात झालेल्या १७ पैकी १६ निवडणुकांमध्ये कॉग्रेस विजयी झाले आहे. शिवाय या १६ पैकी ११ लोकसभा निवडणुकीत म्हणजे १९८० ते २००९ या काळात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने प्रतिनिधीत्व केलेले आहे.
दरम्यान, २०१४ साली आलेल्या मोदी लाटेत पहिल्यादा कॉंग्रेसचे माजीमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. कॉंग्रेसमधून ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करूनही २०१४ च्या निवडणुकीत संजय पाटील विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संजय पाटील यांनी बाजी मारली. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत.
वर्ष - उमेदवार - पक्ष
१९५२ - व्यंकटराव पवार - कॉंग्रेस
१९५७ - बळवंत ऊर्फ बाळासाहेब पाटील - शेतकरी कामगार पक्ष
१९६२ - विजयसिंहराव डफळे - काँग्रेस
१९६७ - एस. डी. पाटील - काँग्रेस
१९७१ - गणपती गोटखिंडे - काँग्रेस
१९७७ - गणपती गोटखिंडे - काँग्रेस
१९८० - वसंतदादा पाटील - काँग्रेस
१९८३ - शालिनी पाटील - काँग्रेस
१९८३ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस
१९८९ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस
१९९१ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस
१९९६ - मदन पाटील - काँग्रेस
१९९८ - मदन पाटील - काँग्रेस
१९९९ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस
२००४ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस
२००६ - प्रतीक पाटील - काँग्रेस
२००९ - प्रतीक पाटील - काँग्रेस
२०१४ - संजय पाटील - भाजप
२०१९ - संजय पाटील - भाजप
(१९५७ व १९६२ मध्ये मिरज लोकसभा मतदारसंघ होता. १९८३ व २००६ मध्ये पोटनिवडणूक झाली होती.)