संपत्तीपेक्षा ज्ञानानेच उत्कर्ष होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:27 AM2021-01-08T05:27:05+5:302021-01-08T05:27:05+5:30
इस्लामपूर : कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करायचे असेल, तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये अग्रभागी राहण्यासाठी प्रयत्नांची ...
इस्लामपूर : कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करायचे असेल, तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये अग्रभागी राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांबरोबरच भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र अशा विद्याशाखाही आपण धुंडाळाव्यात. उत्कर्ष संपत्तीपेक्षा ज्ञानानेच होऊ शकतो, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कासेगाव शिक्षण संस्थेच्या यशवंत हायस्कूलमधील विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, संस्थेने गुणवत्तेसाठी केलेल्या विविध प्रयत्नांमुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. कष्ट आणि शिक्षणाच्या जोरावरच माणूस प्रगती करू शकतो.
शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अभिषेक पाटील, सलमा मुल्ला, हर्षाली पाटील, विपुल गेजगे, कपिल कुंभार, अर्पिता भुजुगडे, संतोषी पाटील, श्रद्धा पाटील, श्रेया पाटील, श्रावणी पाटील, नम्रता पाटील, श्रेया सूर्यवंशी, सानिका कोळी, स्वरांजली पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक शरद माळी यांनी स्वागत केले.