कोकरुड पोलीस स्टेशनला ‘आयएसओ’ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:30 AM2021-08-20T04:30:37+5:302021-08-20T04:30:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : येथील कोकरूड पोलीस ठाण्यास आयएसओ मानांकन मिळाले असून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पालकमंत्री जयंत पाटील, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : येथील कोकरूड पोलीस ठाण्यास आयएसओ मानांकन मिळाले असून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पालकमंत्री जयंत पाटील, कोल्हापूर परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आदींच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांना सन्मानित केले.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकरूड पोलीस ठाण्यात ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ संकल्पनेतून अनेक बदल झाले. यामध्ये प्रामुख्याने पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार, बिनतारी संदेश विभाग, सीसीटीएनएस विभाग, गोपनीय विभाग क्राइम विभाग, प्रभारी अधिकारी कक्ष, कारकून विभाग, दुय्यम अधिकारी कक्ष, हजेरी मेजर विभाग, बारणीशी विभाग, पुरुष विश्रांती गृह, महिला विश्रांती गृह, विश्वानंद उद्यान असे विविध विभागांचे सूचना फलक आकर्षक पद्धतीने रंगवले आहेत. एकूणच हा परिसर नयनरम्य वाटत आहे. आयएसओ मानांकनासाठी कोकरूड पोलीस ठाण्याची तपासणी झाली असून यामध्ये कोकरूड पोलीस ठाण्याने बाजी मारत (ए. प्लस. प्लस) मानांकन प्राप्त केले.