कोल्हापूर : संपन्न व्यक्तिमत्त्व, निरोगी मनासाठी संवाद गरजेचा : वसंत भोसले यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:43 PM2018-05-09T13:43:34+5:302018-05-09T13:51:24+5:30

संपन्न व्यक्तिमत्त्वासाठी निरोगी मन आवश्यक असून निरोगी मनासाठी संवादाची गरज आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले.

Kolhapur: The need for a healthy personality, healthy dialogue: Vasant Bhosale's Rendering | कोल्हापूर : संपन्न व्यक्तिमत्त्व, निरोगी मनासाठी संवाद गरजेचा : वसंत भोसले यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : संपन्न व्यक्तिमत्त्व, निरोगी मनासाठी संवाद गरजेचा : वसंत भोसले यांचे प्रतिपादन

Next
ठळक मुद्देसंपन्न व्यक्तिमत्त्व, निरोगी मनासाठी संवाद गरजेचा : वसंत भोसलेआवाजाची ओळख कार्यशाळेचा समारोप

कोल्हापूर : तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे भांडार तुमच्यासमोर खुले झाले आहे. मात्र, संवाद कमी झाला आहे. संवादाच्या देवाण-घेवाणीने आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो. सर्जनशीलतेला नवे पैलू पडतात. ज्ञानात भर पडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे, उणिवांचे आपल्याला मूल्यांकन करता येते. संपन्न व्यक्तिमत्त्वासाठी निरोगी मन आवश्यक असून निरोगी मनासाठी संवादाची गरज आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले.

कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या सभागृहात मंगळवारी ‘फ्रिक्वेन्सिज’तर्फे ‘आवाजाची ओळख’ या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योजक प्रताप कोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये निवेदक निनाद काळे मार्गदर्शन केले.

संपादक भोसले म्हणाले,आवाजाची ओळख हा नवा प्रयोग कौतुकास्पद आहे; असे नवनवे प्रयोग होणे गरजेचे आहे. आपले व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी हे उत्तम ठिकाण असून समाजात उत्तम माणूस घडविणारी ही कार्यशाळा आहे.

प्रताप कोंडेकर म्हणाले, आपल्यात जरी क्षमता असली तरी आपल्याकडे संभाषण कौशल्य नसले तर आपण मागे पडतो. संवादासह आपली योग्य देहबोली व्यवस्थित असणे गरजेचे आहे. आयुष्यात चांगली संगत खूप काही नवीन गोष्टी शिकवत असते.

निनाद काळे म्हणाले, शिक्षणासह आजच्या काळात बोलण्याचा पाया भक्कम असावा लागतो.आदर्श नागरिक घडविण्यासोबत विचारांची देवाण -घेवाण करणारी माणूसपणाची चळवळ आहे. बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे.

या कार्यशाळेत आवाजाची ओळख, जीभ, ओठांच्या व्यायामाचे प्रकार, आवाजाचे चढ-उतार, हातवारे कसे करायचे, विषय समजून घेऊन मगच स्वयंस्फूर्तीने कसे बोलायचे, याचे मार्गदर्शन करण्यात आले.



याप्रसंगी सहभागी प्रशिक्षणार्र्थींना जिभेचा व्यायाम, सिंहमुद्रेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या कार्यशाळेतून व्यासपीठावर बोलण्याचा आमचा आत्मविश्वास वाढला असल्याचे मनोगत सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्र्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. ‘फ्रिक्वेन्सिज’च्या संचालिका संगीता राठोड यांनी कार्यशाळेचे नियोजन केले होते. याप्रसंगी मुक्ता राजगोळकरने प्रास्ताविक केले. सुकुमार पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी मनिष राजगोळकर, सुधीर गावडे यांच्यासह प्रशिक्षणार्थीचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Kolhapur: The need for a healthy personality, healthy dialogue: Vasant Bhosale's Rendering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.