सांगलीच्या सुमधूर द्राक्षांची कोल्हापुरकरांना भूरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 02:00 PM2021-03-29T14:00:18+5:302021-03-29T14:20:40+5:30
grape fruits kolhpaur- सांगलीच्या उच्च प्रतीच्या टपोऱ्या, रसरशीत, सुमधूर द्राक्षांची कोल्हापूरकरांनाही भुरळ पडली. महोत्सवाच्या निमित्ताने शाहू स्मारकमध्ये खरेदीसाठी अक्षरश: उड्या पडल्या होत्या. माल संपेल तसा परत मागवून आणण्याची वेळ आली. दोनच दिवसात १२ टन द्राक्षांची विक्री झाली. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विक्रेत्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले.
कोल्हापूर: सांगलीच्या उच्च प्रतीच्या टपोऱ्या, रसरशीत, सुमधूर द्राक्षांची कोल्हापूरकरांनाही भुरळ पडली. महोत्सवाच्या निमित्ताने शाहू स्मारकमध्ये खरेदीसाठी अक्षरश: उड्या पडल्या होत्या. माल संपेल तसा परत मागवून आणण्याची वेळ आली. दोनच दिवसात १२ टन द्राक्षांची विक्री झाली. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विक्रेत्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले.
उत्पादक ते ग्राहक अशी साखळी जोडण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य पणन मंडळ आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कोल्हापुरात पहिल्यांदाच दसरा चौकातील शाहू स्मारकामध्ये द्राक्ष महोत्सव भरविण्यात आला आहे. सोनी (ता. मिरज) येथील दहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची द्राक्षे येथे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. मंगळवार (दि. ३०)पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरकरांनी तुफान प्रतिसाद दिला. शुक्रवारी उद्घाटनाच्या दिवशी चार टन द्राक्षांची विक्री झाली.
सकाळपासून ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. दुपारी सर्व माल संपल्यानंतर लागलीच विक्रेत्यांनी आणखी माल मागवून घेतला. अनुष्का, सुपर सोनाक्का, माणीकचमण, रेडग्लोब, कृष्णा, जम्मो सिडलेस या जातींच्या द्राक्षांची चव चाखायला मिळत असल्याने आणि ग्राहकांच्या आग्रहास्तव दरही कमी केल्याने खरेदीसाठी गर्दी वाढली. एकाच दिवसात आठ टनाहून अधिक माल संपला.
मागील आठवड्यात गोव्यात झालेल्या महोत्सवापेक्षा जास्त प्रतिसाद कोल्हापुरात मिळत आहे. विक्रीही चांगली झाल्याने येथे आल्याचे समाधान वाटत आहे. अशाप्रकारे महोत्सव भरवल्याने उत्पादकांना चार पैसे चांगले मिळतात.
विजय पाटील,
द्राक्ष उत्पादक, सोनी, ता. मिरज, जि. सांगली