दुचाकी अपघातात कोंतेवबोबलादचे तलाठी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:33 AM2021-09-09T04:33:12+5:302021-09-09T04:33:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : कोंतेवबोबलाद (ता. जत) येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात तलाठी दीपक जगन्नाथ ठाकरे (वय २७) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : कोंतेवबोबलाद (ता. जत) येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात तलाठी दीपक जगन्नाथ ठाकरे (वय २७) हे ठार झाले, तर एक जखमी झाला. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजता गावापासून दीड किलोमीटर अंतरावर तिकोंडी-कोंतेवबोबलाद रस्त्यावर घडली. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मृत तलाठी दीपक ठाकरे हे जत येथील मोरे कॉलनीत राहण्यास आहेत. ते जतमधून दुुुचाकीने (क्र. एमएच ३९ क्यू. ७७४४) कोंतेवबोबलादकडे जात होते. तिकोंडी येथील युवक दुचाकी (क्र. एमएच १० बी.सी ४९६१) वरुन गावी जात होता. कोंतेवबोबलाद रस्त्यावर दुचाकींची समोरासमोरील धडक झाली. धडक इतकी जोरात होती की, ठाकरे उडून रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला; तर तिकोंडी येथील युवक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. दीपक ठाकरे यांचे मूळ गाव साक्री (जि. धुळे) आहे. ते गेल्या एक वर्षापासून कोंतेवबोबलाद येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. ते अविवाहित आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार भगवान कोळी करीत आहेत.