शिराळा तालुक्यात प्रथमच कोरियन उपचार थेरपी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:18+5:302021-04-15T04:25:18+5:30
कोकरुड : शेडगेवाडी फाटा (ता. शिराळा) येथे प्रकाश किरण आयुर्वेदिक व अक्युप्रेशर सेवा केंद्रात सर्व प्रकारच्या आजारावरील मार्गदर्शन केले ...
कोकरुड : शेडगेवाडी फाटा (ता. शिराळा) येथे प्रकाश किरण आयुर्वेदिक व अक्युप्रेशर सेवा केंद्रात सर्व प्रकारच्या आजारावरील मार्गदर्शन केले जात असून मणक्याच्या विविध प्रकारांवर अत्याधुनिक थेरपीच्या साहाय्याने मणका पूर्ववत करण्याचे काम होत असल्याची माहिती डॉ. प्रकाश मकामले-पाटील यांनी दिली.
डॉ. प्रकाश पाटील म्हणाले, मेडिकल उपचार पद्धतीमध्ये मिळणाऱ्या गोळ्यांमधून तात्पुरता आराम मिळत असतो. त्याचा कायमचा नायनाट होत नाही. मात्र आयुर्वेदिक उपचार पद्धतीसाठी काही दिवस जास्त लागतात, पण आजार कायमचा बरा होत असतो. याचप्रकारे शिराळा तालुक्यात प्रथमच बायो हेल्थ वर्ल्डच्या साहाय्याने कोरियन थेरपीने सर्व प्रकारचे मणक्याचे त्रास, वात, संधिवात, गुडघे, कंबर, उठता-बसता न येणे, साखर, रक्तदाब, दमा, अस्थमा, हृदयाचे ब्लॉक, लकवा, मूळव्याध, कॅन्सर यासारख्या विविध प्रकारच्या आजारावर कमी खर्चात उपचार होत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण त्रासावर पलूस, निपाणी या ठिकाणी दररोज आरोग्याविषयी मोफत सल्ला देऊन उपचार केले जातात. शेडगेवाडी फाटा येथे गुढीपाडव्यापासून शरीरातील आजारांविषयी मोफत सल्ला आणि रुग्णास दोन दिवस माेफत थेरपी उपचार सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व सेवा केंद्रात रोगप्रतिकार शक्ती वर्धक आयुर्वेदिक चूर्ण उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.