खासगी शिकवणी वर्गासाठी कोविड जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:40 AM2021-02-23T04:40:32+5:302021-02-23T04:40:32+5:30

साहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी शिकवणी वर्गचालकांनी विद्यार्थ्यांमार्फत कोविड जनजागृती अभियान राबविल्यास निरोगी समाज निर्माण ...

Kovid Awareness Campaign for Private Teaching Classes | खासगी शिकवणी वर्गासाठी कोविड जनजागृती अभियान

खासगी शिकवणी वर्गासाठी कोविड जनजागृती अभियान

Next

साहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी शिकवणी वर्गचालकांनी विद्यार्थ्यांमार्फत कोविड जनजागृती अभियान राबविल्यास निरोगी समाज निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. आरोग्याधिकारी डाॅ. रवींद्र ताटे यांनी सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्स याचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. एका बेंचवर एक विद्यार्थी याप्रमाणे जास्तीत जास्त ५० विद्यार्थी असावेत. मोठा हॉल असला तरी ५० पेक्षा जास्त विद्यार्थी घेऊ नयेत, असे डॉ. ताटे म्हणाले. शिकवणी हॉलचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिकवणीला येणारा विद्यार्थी हा स्वेच्छेने येतो. आजारी असेल तर पालक विद्यार्थ्याला शिकवणीला पाठवत नाहीत. बहुतांश विद्यार्थी हे एकमेकांचे मित्र असल्याने ते परस्पर संपर्कात येतात. एकमेकांच्या घरी अभ्यासाला जातात, अनेक तास एकत्र फिरतात. यामुळे सोशल डिस्टन्स ठेवणे कठीण होते, ही बाब अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावी, असे प्रा. डॉ. रवींद्र फडके यांनी सांगितले. अजहर बारस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष तांबोळकर यांनी स्वागत केले. राम हुनुरगे व अल्ताफ पटेल यांनी सूत्रसंचालन केले. अनुपमा भोसले, प्राजक्ता मराठे, वरुण हराळे, डॉ. मयूरी फडके, मीनाक्षी फडके, सुधीर गोरे उपस्थित होते. सरवर खान यांनी आभार मानले.

Web Title: Kovid Awareness Campaign for Private Teaching Classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.