आष्ट्यात डांगे आयुर्वेद महाविद्यालयाचे कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:20+5:302021-04-14T04:24:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या धन्वंतरी रुग्णालयातील कोविड सेंटर रुग्णांना वरदान ठरेल, ...

Kovid Center of Dange Ayurveda College started in Ashta | आष्ट्यात डांगे आयुर्वेद महाविद्यालयाचे कोविड सेंटर सुरू

आष्ट्यात डांगे आयुर्वेद महाविद्यालयाचे कोविड सेंटर सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या धन्वंतरी रुग्णालयातील कोविड सेंटर रुग्णांना वरदान ठरेल, असे प्रतिपादन आष्ट्याच्या अप्पर तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.

कोविड सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री व संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र ऊर्फ चिमण डांगे, विश्वनाथ डांगे, व्यवस्थापक सुनील शिनगारे प्रमुख उपस्थित होते.

दीक्षांत देशपांडे म्हणाले, 'कोविड महामारीच्या काळात आष्टा कोविड सेंटरच्या माध्यमातून गतवर्षी अनेक रुग्णांना जीवदान मिळाले होते. सध्याच्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या काळात रुग्णांची सोय व्हावी, त्यांना दिलासा मिळावा, या हेतूने सुरू झालेले धन्वंतरी रुग्णालय कोविड सेंटर रुग्णांना वरदान ठरेल.’

अण्णासाहेब डांगे म्हणाले, ‘कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याची वेळ कोणावर येऊ नये आणि जर दुर्दैवाने व्हावेच लागले तर उपलब्ध सोयीसुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांनी त्या रुग्णांना वेळेवर योग्य ते उपचार निश्चित मिळतील अशी आशा व्यक्त केली.

प्राचार्य डॉ. एस. एन. ओझा यांनी सर्व सोयींनी युक्त साठ बेडच्या सेंटरविषयी माहिती दिली. कोविड सेंटरचे समन्वयक डॉ. जयवंत खरात यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. सतीश परांजपे, डॉ. तुषार शेलार, डॉ. राहुल सांगोलकर, डॉ. सूरज पाटील, डॉ. सुशांत जगदाळे, डॉ. पंकज शहा, डॉ. संजीवनी कटरे या डॉक्टरांच्या टीमसोबत अध्यापक, रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. डॉ. विजय निकम यांनी आभार मानले.

Web Title: Kovid Center of Dange Ayurveda College started in Ashta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.