निशिकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:31+5:302021-07-14T04:32:31+5:30
इस्लामपूर येथे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड योद्ध्यांचा जगन्नाथ मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी धैर्यशील मोरे, ...
इस्लामपूर येथे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड योद्ध्यांचा जगन्नाथ मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी धैर्यशील मोरे, पै.रोहित पाटील, अशोक खोत, प्रवीण परीट, सतेज पाटील, प्रवीण माने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सलग दोन वर्षांपासून कोरोना विरोधात सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर, नर्सेस, आशासेविका, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, प्रशासन, अधिकारी, कर्मचारी विविध पद्धतीने कोरोनाविरोधात काम करत असून, रुग्ण व नातेवाइकांना संकटात आधार देत, मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व योद्ध्यांचा नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. त्यांना पुढील कार्यासाठी ऊर्जा मिळावी, म्हणून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील प्रकाश शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टी व निशिकांतदादा युथ फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे प्रमुख उपस्थित होते. भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील अध्यक्षस्थानी होते. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील कोविड योद्ध्यांचा मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.राहुल नाकील, शहराध्यक्ष अशोक खोत, युवामोर्चाचे शहराध्यक्ष सतेज पाटील, शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिताताई पवार, मुकुंद रासकर, शरद अवसरे, प्रांजली अर्बन निधी बँकेचे संचालक पोपट पवार, प्रमोद डांगे, ढवळीचे ज्येष्ठ नेते शरद पाटील, संजय हवालदार, आष्टा शहराध्यक्ष उदय कवठेकर, निवास पाटील, गजानन पाटील, प्रकाश कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे, निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अक्षय कदम, प्रवीण परीट, दीपक पाटील, लवंडमाची ग्रामपंचायत सदस्य रामदास सरोदे, विक्रम शिंदे, प्रांजली अर्बन निधी बॅँकेचे कार्यकारी संचालक रणजीत पाटील उपस्थित होते.
निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण माने यांनी स्वागत केले. युथ फाउंडेशनचे मार्गदर्शक अक्षय भाेसले-पाटील, संदीप यादव, विश्वजीत पाटील, सागर जाधव, रणधीर फार्णे यांनी संयोजन केले.
चौकट
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भारतीय जनता पार्टी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ व निशिकांत दादा युथ फाउंडेशनच्या वतीने नगराध्यक्ष, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रकाश ब्लड बँकेच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १०५ युवकांनी रक्तदान करून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचे उद्घाटन संदीप यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
वृक्षारोपन...
नगराध्यक्ष, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील इस्लामपूर, आष्टा, साखराळे, रेठरे हरणाक्ष, कारंदवाडी, वाटेगाव, तुंग, मिरजवाडी, मर्दवाडी, दुधगाव आदी गावांमध्ये भाजपा व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.