कोयना एक्स्प्रेस विजेवर धावली, १५ मिनिटे आधी मिरजेत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:10 PM2022-06-06T17:10:47+5:302022-06-06T17:11:46+5:30
मिरज - पुणे-मिरज-कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाल्यानंतर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस प्रथमच विजेवर धावली. पुणे स्थानकातून दुपारी १२ ...
मिरज - पुणे-मिरज-कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाल्यानंतर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस प्रथमच विजेवर धावली. पुणे स्थानकातून दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी निघालेली कोयना एक्स्प्रेस मिरज स्थानकात सायंकाळी ६ वाजून ४५ मिनीटांनी सहा तासात पोहचली. नेहमीच्या पोहचण्याच्या वेळेपूर्वी १५ मिनीटे लवकर गाडी मिरज स्थानकात विद्युत इंजिनसह मिरजेत पोहोचली. यामुळे मिरज-पुणे मार्गावर कोयनेसह महालक्ष्मी, गोंदिया एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने दि.५ पासून महालक्ष्मी एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र महालक्ष्मी एक्स्प्रेस पूर्वीच रविवारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबईतून आपल्या निर्धारित वेळेत निघाली. पुण्यातूनही विद्युत इंजिनावर ताशी शंभर किलोमीटर वेगात ही एक्स्प्रेस मिरज स्थानकात वेळेपुर्वीच येऊन पुढे कोल्हापूर कडे रवाना झाली.
पुणे-मिरज पर्यंत कोणताही अडथळा न येता गाडी विजेवर धावल्याची माहिती कोयनाचे इंजिनचालक बी. रामबापू यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक चालक प्रदीप नायक, एम. के. सैन, सागर काशिद उपस्थित होते. पुणे ते कोल्हापूर पर्यंत विना अडथळा विद्युत इंजिनावर धावल्याने आता कोल्हापूर व मिरजेतून अनेक एक्स्प्रेस गाड्या विजेवर सुरु होणार आहेत.