..म्हणून कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार, प्रवाशांची होणार गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:03 PM2022-03-11T18:03:11+5:302022-03-11T18:11:18+5:30
त्यामुळे कोल्हापुरातून मुंबईला जाणारी कोयना एक्स्प्रेस आता पुण्यापर्यंतच जाणार आहे
मिरज : पुण्यात खडकी-शिवाजीनगर रेल्वे स्थानकांदरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातून मुंबईला जाणारी कोयना एक्स्प्रेस आता पुण्यापर्यंतच जाणार आहे. मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होणार आहे.
मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (गाडी क्र. ११०२९) शनिवारी पुण्याहून कोल्हापुरात परत येईल. पुढील आदेशापर्यंत ही रेल्वे पुणे ते प्रवास सुरू आहे. या कोल्हापूरपर्यंत करणार असल्याने कोल्हापूर, मिरज, सांगली येथील प्रवाशांना पुण्यापर्यंतचाच प्रवास करावा लागणार आहे.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम खडकी ते शिवाजीनगर स्थानकांदरम्यान मार्गाच्या कामामुळे पुणे ते मुंबई रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्यांसह पुणे-मुंबई लोकल रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत किंवा विलंबाने धावत आहेत. कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.