क्रांती कारखान्याने शेतकरीहित जपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:28 AM2021-01-03T04:28:03+5:302021-01-03T04:28:03+5:30
ते कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यात विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा ...
ते कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यात विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा पुरस्कार वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
लाड म्हणाले, क्रांती कारखाना बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि ऊस विकास सुविधा पुरवित आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन शक्य झाले आहे. शेतीचे अर्थकारण आणि ऊस पीक शरीरशास्त्र लक्षात घेऊन शेती केल्याने एकरी उत्पादन वाढून आर्थिक सुबत्ता आली आहे.
जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड म्हणाले, जी. डी. बापूंनी सहकाराचे रोपटे लावले. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झााले आहे. शासनाने साखरेची खरेदी किंमत वाढविणे आवश्यक आहे.
यावेळी आडसाली लागण प्रकारातून अमर रमेश जाधव (कुंभारगाव) यांचा प्रथम, संतोष पांडुरंग जाधव (वाझर) यांचा व्दितीय, तर किरण लक्ष्मण लाड (देवराष्ट्रे) यांचा तृतीय क्रमांक आला. पूर्वहंगामातून मारुती गणपती सूर्यवंशी (भाळवणी) यांचा प्रथम, जयप्रकाश रामचंद्र लावंगार (व्दितीय), विजय पांडुरंग पवार (तृतीय), तर सुरू हंगामातून प्रवीण प्रकाश जाधव (कुंडल) यांचा प्रथम, गोरख आबू कोकाटे (बलवडी) यांचा व्दितीय, तर खोडवा प्रकारातून सुरेश रामचंद्र पवार (वाझर) यांचा प्रथम, कविता दिलीप जमदाडे (कुंभारगाव) यांचा व्दितीय, संतोष पांडुरंग जाधव (वाझर) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, वसंतराव लाड, कुंडलिक एडके, जगन्नाथ आवटे, अनिल लाड, संचालक आत्माराम हारुगडे, कुंडलिक थोरात, जयराम कुंभार, आर. के. सावंत, संपतराव सावंत, मंगल पाटील, अंकुश यादव, नारायण पाटील, संदीप पवार, आप्पासाहेब जाधव, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे आदी उपस्थित होते. ऊसविकास अधिकारी विलास जाधव यांनी स्वागत केले. शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांनी आभार मानले.
फोटो : ०२ पलुस १
ओळ: कुंडल (ता. पलूस) येथे विक्रमी ऊस उत्पादक घेतलेल्या शेतकऱ्यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण लाड, शरद लाड यांनी सन्मान केला.