कृषी पारायणातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:28 AM2021-09-27T04:28:56+5:302021-09-27T04:28:56+5:30

पुनवत : कृषी पारायणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हाती घेतला आहे, असे प्रतिपादन ...

Krishi Parayana will enlighten the farmers | कृषी पारायणातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार

कृषी पारायणातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार

Next

पुनवत : कृषी पारायणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हाती घेतला आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

सागाव (ता. शिराळा) ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा व लोकसेवा हक्क आयोगाच्या सहसचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल माणिकराव दिवे यांचा सत्कार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

नाईक म्हणाले, आपल्या मातीतील माणसं मोठ्या पदावर जाणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पुरामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पुरामुळे नुकसान होणार नाही, असे उसाचे वाण राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित करावेत.

यावेळी सरपंच तात्या पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील, विश्वास कारखान्याचे संचालक मानसिंगराव पाटील, वारणा बॅंकेचे संचालक बळवंत पाटील, माजी सभापती चंद्रकांत पाटील, माजी सरपंच रामचंद्र संकपाळ, प्रचिती दूध संघाचे संचालक सदाशिव संकपाळ, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी माने, सुशांत पाटील, जयसिंग पाटील, बाबासाहेब पाटील, डॉ. बाळासाहेब लाडगावकर, श्रीनिवास बागल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपसरपंच सत्यजित पाटील यांनी स्वागत केले. अशोक कोकाटे यांनी सूत्रसंचलन केले. उदय पाटील यांनी आभार मानले.

फोटो : २६ पुनवत १

ओळ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा सागाव ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माणिकराव दिवे, सरपंच तात्या पाटील, सत्यजित पाटील, बळवंत पाटील, मानसिंगराव पाटील, बाळासाहेब लाडगावकर उपस्थित होते.

Web Title: Krishi Parayana will enlighten the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.