दुधोंडीमध्ये कृष्णा कालव्याचे काम अर्धवट

By admin | Published: December 14, 2014 10:00 PM2014-12-14T22:00:23+5:302014-12-14T23:49:41+5:30

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : झाडाझुडपांच्या साम्राज्यामुळे दुरवस्था

Krishna canal work in milk powder | दुधोंडीमध्ये कृष्णा कालव्याचे काम अर्धवट

दुधोंडीमध्ये कृष्णा कालव्याचे काम अर्धवट

Next

दुधोंडी : पलूस तालुक्यातील दुधोंडी ते पुणदीदरम्यान असलेल्या कृष्णा पोटकालव्याची अर्धवट कामामुळे दुरवस्था झाली आहे. झाडाझुडपांमुळे पोटकालव्याची सध्या इतकी दुरवस्था झाली आहे की, पाणी पुढे न सरकता पात्राबाहेर पडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे.
या पोटकालव्याच्या पाण्यावर ३००-४०० एकर जमीन ओलिताखाली येते; मात्र सध्याची पोटकालव्याची स्थिती पाहता, सर्व शेती धोक्याची बनत आहे. पोटकालव्याचे काम २००९ मध्ये सुरू झाले व २०११ ला बंद झाले. यावेळी कालव्यामधील झाडेझुडपे काढून कालव्याची खुदाई करून त्यात मुरूम भरून सपाटीकरण करण्यात आले व दोन्ही बाजूला रस्ते करण्यात आले. मात्र रस्त्याचे काम पक्के न झाल्याने वाहतूक करता येत नव्हती. फक्त पाऊलवाट पडली, पावसाळ्यात तीही बंद झाली. झाडाझुडपांमुळे रस्ता गायब झाला आहे.
सध्या कालव्यामध्ये झाडेझुडपे व काटेरी वनस्पती वाढल्याने पाणी प्रवाहास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रसंगी आजूबाजूची शेती धोक्यात आली आहे. या कालव्यावर ३००-३५० एकर शेती अवलंबून आहे.
हा कृष्णा कालवा बारमाही करण्यासाठी व कायमस्वरूपी ३ टीएमसी पाणी पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाविरुध्द उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर तीन टीएमसी पाणी मिळविण्यात यश मिळविले. मात्र कालव्याच्या दुरवस्थेमुळे या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. तरी संबंधित खात्याने या कालव्याच्या दुरवस्थेची दखल घेऊन कालव्यामधील झाडे-झुडपे काढून काँक्रिटीकरण करावे व रस्त्याचे काम पक्के करून रस्ता रहदारीयुक्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Krishna canal work in milk powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.