कृष्णा कारखान्यास ३० कोटींचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:32+5:302021-03-27T04:27:32+5:30
रेठरे बुद्रूक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. उपाध्यक्ष ...
रेठरे बुद्रूक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने झाली.
उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, सुजीत मोरे, गिरीश पाटील, ब्रिजराज मोहिते, सौ. जयश्री पाटील, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, दिलीप पाटील, अविनाश मोहिते, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले की, आधुनिकीकरणासाठी जेवढा खर्च झाला, तेवढे अधिक उत्पन्न वर्षात मिळाले आहे. इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले असून, येत्या काळात थेट रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा मानस आहे. निर्यातक्षम साखर निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. कामगारांना तीनदा पगारवाढ देण्यात आली आहे. डिस्टिलरीतून ३० कोटी ७५ लाखांचा नफा झाला आहे.
सचिव मुकेश पवार यांनी इतिवृत्तांत वाचून दाखविला.
फोटो ओळी :
रेठरे बुद्रूक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा साखर कारखान्याच्या ऑनलाइन सभेत डॉ. सुरेश भोसले यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.