वाहतूकदार, कंत्राटदारामुळे कृष्णा कारखान्याचा हंगाम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:55+5:302021-05-21T04:27:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : गत गळीत हंगामावर कोरोनाचे संकट असतानाही ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे हंगाम यशस्वी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : गत गळीत हंगामावर कोरोनाचे संकट असतानाही ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे हंगाम यशस्वी पार पाडू शकलो. गेल्या पाच वर्षांत ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेची येणे बाकी शून्य रुपये असल्याने ‘कृष्णा’ने इतर साखर कारखानदारीसमोर आदर्श घालून दिलेला असल्याचे मत संचालक धोंडिराम जाधव यांनी व्यक्त केले. रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा प्रारंभ कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक दिलीपराव पाटील, ब्रीजराज मोहिते, सुजित मोरे, पांडुरंग होनमाने, गिरीश पाटील, प्रमोद पाटील, मनोज पाटील, प्रकाश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
सचिव मुकेश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहायक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, केनयार्ड सुपरव्हायझर विजय मोहिते, लेबर अँड वेल्फेअर ऑफिसर अरुण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम, आदींसह ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदार उपस्थित होते. संचालक पांडुरंग होनमाने यांनी आभार मानले.