‘कृष्णा’ कारखान्याने सभासदांचे हित साधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:28+5:302021-03-19T04:25:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले असून, एफआरपीपेक्षा जास्त रक्कम जमा देणारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले असून, एफआरपीपेक्षा जास्त रक्कम जमा देणारा एकमेव आपला कारखाना आहे. तसेच शासनाला सर्वांत जास्त महसूल दिल्यामुळे शासनाने आपल्याला गौरवण्यात आले आहे. यावरून आपल्या कारखान्याची परिस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी विरोधाजवळ जागा आहे का? असा सवाल कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले.
पेठ (ता. वाळवा) येथे सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. अतुल भोसले म्हणाले की, कृष्णा साखर कशा पद्धतीने चालवायचा हे मला हणमंतरावकाका यांनी शिकवले. पेठ गावाने आमच्या कुटुंबावर पहिल्यापासून प्रेम केले आहे. विरोधी गटाने कारखान्यावर इतके कर्ज केले होते की, यामुळे आमच्या संचालक मंडळाला वाहतूकदाराचे पैसे द्यायलासुद्धा नव्हते. मात्र, यातूनही कारखाना बाहेर काढून प्रगतीपथावर नेला आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक संजय पाटील, लिबाजी पाटील, जितेंद्र पाटील, गिरीश पाटील, दिलीप पाटील, विजय पाटील, शरद पाटील, संपतराव पाटील, विजय पाटील, हंबीरराव पाटील, नामदेव कदम, फिरोज ढगे, डॉ. मोहन पाटील, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.