कृष्णा रोकडे यांच्या नावाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:47 AM2021-02-18T04:47:04+5:302021-02-18T04:47:04+5:30
नेर्ले : स्वप्नस्फुर्ती टीईटी, सीटीईटी व टीएआयटी मार्गदर्शन केंद्र, इस्लामपूरचे संचालक व लेखक प्रा. कृष्णा रोकडे यांच्या शिक्षक पात्रता ...
नेर्ले : स्वप्नस्फुर्ती टीईटी, सीटीईटी व टीएआयटी मार्गदर्शन केंद्र, इस्लामपूरचे संचालक व लेखक प्रा. कृष्णा रोकडे यांच्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सलग व सर्वाधिक वेळा पात्रता धारण करण्याच्या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेऊन त्यांचे नाव २०२२मध्ये नोंदविण्यात आले. या अतुलनीय कामगिरीबद्दल रोकडे यांना प्रशस्तीपत्र, सुवर्णपदक, इंडिया बुकचे ओळखपत्र व इंडिया बुक २०२१ देऊन गौरविण्यात आले.
शिक्षक पात्रता परीक्षा राज्य सरकार २०१३ सालापासून तर केंद्र सरकार २०११ सालापासून घेत आहे. या परीक्षेसाठी डी. एड्. व बी. एड्.चे विद्यार्थी लाखोंच्या संख्येने बसतात. एकदा तरी पात्रता धारण करण्याचा अतोनात प्रयत्न करतात. परंतु, अनेकांना या प्रयत्नांमध्ये क्वचितच यश मिळते. दरवर्षी या परीक्षेचा निकाल तीन ते पाच टक्के इतकाच लागत असताना प्रा. कृष्णा रोकडे यांनी सलग नऊवेळा ही पात्रता धारण करण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम नोंदवून प्रा. रोकडे यांनी भावी शिक्षक होऊ पाहणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
फोटो - १७०२२०२१-आयएसएलएम-कृष्णा रोकडे