कृष्णा कारखान्यात राजकारण आणणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:53+5:302021-06-22T04:18:53+5:30

कृष्णाची कमी झालेली विश्वासार्हता डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने पुन्हा पूर्वपदावर आणली आहे. त्यामुळे सभासद सहकार पॅनेलवरच ...

Krishna will not bring politics into the factory | कृष्णा कारखान्यात राजकारण आणणार नाही

कृष्णा कारखान्यात राजकारण आणणार नाही

Next

कृष्णाची कमी झालेली विश्वासार्हता डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने पुन्हा पूर्वपदावर आणली आहे. त्यामुळे सभासद सहकार पॅनेलवरच आपला विश्वास दाखवतील, असा विश्वास कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.

भवानीनगर (ता. वाळवा) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार पॅनलचे उमेदवार जितेंद्र पाटील, संजय पाटील, जयवंत मोरे, अविनाश खरात, मनोज पाटील, डॉ. सुशील सावंत, रघुनाथराव मोहिते, बाबासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ सावंत, शंकर मोहिते, अशोक मोहिते, प्रदीप गोडसे, युवराज गोडसे, सयाजी पाटील, विजय सावंत, अशोकराव गोडसे आदी उपस्थित होते.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, की मागील संचालक मंडळाने काय केले हे सभासदांना माहिती आहे. निवडणूक म्हटले की टीकाटिप्पणी आली. पण विरोधकांनी त्यांच्या काळात काय चांगले केले हे त्यांना सांगता येत नाही. आम्ही मात्र या सहा वर्षांत काय केले व पुढे काय करणार, याचा लेखाजोखा सभासदांपुढे नेत आहोत. सभासदांना योग्य न्याय देण्याची भूमिका सहकार पॅनलने कायम ठेवली. राज्यात कृष्णा पहिल्या पाचमध्ये आहे. पुढील काळात तो एक नंबरला राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. डॉ. सुशील सावंत, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ सावंत, प्रदीप गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. आनंदराव भोसले यांनी आभार मानले.

फोटो : २१ शिरटे १

ओळ :

भवानीनगर (ता. वाळवा) येथे सभासद संपर्क दौराप्रसंगी डॉ. अतुल भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जितेंद्र पाटील, संजय पाटील, जयवंत मोरे, अविनाश खरात, मनोज पाटील उपस्थित होते.

Web Title: Krishna will not bring politics into the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.