‘कृष्णा’ची निवडणूक पुढे ढकलावी : अनिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:13+5:302021-04-24T04:27:13+5:30

इस्लामपूर : सातारा, सांगली जिल्ह्यांत कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा विचार करून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर ...

Krishna's election should be postponed: Anil Patil | ‘कृष्णा’ची निवडणूक पुढे ढकलावी : अनिल पाटील

‘कृष्णा’ची निवडणूक पुढे ढकलावी : अनिल पाटील

Next

इस्लामपूर : सातारा, सांगली जिल्ह्यांत कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा विचार करून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची येणारी निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी कारखान्याचे सभासद अनिल भीमराव पाटील (रा. कामेरी, ता. वाळवा) यांनी सातारा व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाची दुसरी लाट पसरत आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक न्यायालयाच्या आदेशाने होत आहे. परंतु, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत कोरोनाच्या लाटेने उत्पात मांडला आहे. या उद्रेकीय परिस्थितीचा विचार करता ही निवडणूक सभासदांच्या हितासाठी पुढे ढकलावी, अशी मागणी निवेदनाद्वारे पाटील यांनी केली आहे. हे निवेदन उच्च न्यायालय, सहकार आयुक्त यांना देण्यात आले आहे.

Web Title: Krishna's election should be postponed: Anil Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.