नागनाथआण्णांमुळेच आटपाडी तालुक्यात कृष्णेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:29 AM2021-05-27T04:29:12+5:302021-05-27T04:29:12+5:30

आटपाडी : क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, डॉ. भारत पाटणकर यांच्यामुळेच दुष्काळी तालुक्यात कृष्णामाई अवतरल्याचे गौरवोद्‌गार ...

Krishna's water in Atpadi taluka due to Nagnath Anna | नागनाथआण्णांमुळेच आटपाडी तालुक्यात कृष्णेचे पाणी

नागनाथआण्णांमुळेच आटपाडी तालुक्यात कृष्णेचे पाणी

Next

आटपाडी : क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, डॉ. भारत पाटणकर यांच्यामुळेच दुष्काळी तालुक्यात कृष्णामाई अवतरल्याचे गौरवोद्‌गार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील यांनी काढले.

आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथील पुकळे वस्तीजवळच्या ओढ्यातील कृष्णामाईच्या वाहत्या पाण्याचे पूजनप्रसंगी आनंदराव पाटील बोलत होते. यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, श्रीरंग कदम, सादिक खाटिक, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, तालुका सरचिटणीस विजय पुजारी, पाणी फौंडेशनचे गौरीहर पवार, प्रकाश बोराडे आदी उपस्थित होते.

आनंदराव पाटील म्हणाले, नागनाथअण्णा नायकवडी यांनी दुष्काळग्रस्तांना पाणी मिळावे, यासाठी तीव्र लढा दिला होता. अनेक मोर्चे, आंदोलने केल्यामुळेच आज आटपाडी तालुक्यात पाणी दिसत आहे. सध्या व्हीजन ७५ या संकल्पातून राज्याचे जलसंपदा मंत्री पाटील यांना अन्न, धान्य, फळे उत्पादनातून सांगली जिल्ह्याला देशात अग्रस्थानी न्यायचे आहे. या भागात आलेल्या कृष्णामाईच्या पाण्यातून शेतीत उत्तम दर्जाची पिके येणार आहेत. विजापूरला होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जागतिक बाजार पेठे शेती उत्पादन उपलब्ध होणार आहे.

यावेळी यशवंतराव पुकळे, विठ्ठलराव पुकळे, भगवान दाईंगडे, प्रा . राहुल पुकळे, नाना दाईंगडे, संजय पुकळे, दत्तात्रय पुकळे, विठ्ठल पुकळे, चंद्रकांत ऐवळे, प्रणय लोकरे, सागर दाईंगडे, सागर राक्षे, पोपट चव्हाण, सदाशिव चव्हाण, मारुती मेटकरी , संजय मेटकरी , बाबूराव मेटकरी, बाळासोा डांगे गुरुजी, किसान पुकळे, बापू तळे, गंगाराम चव्हाण, दादासोा पुकळे उपस्थित होते.

Web Title: Krishna's water in Atpadi taluka due to Nagnath Anna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.