कुपवाडमध्ये भव्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:45+5:302021-04-26T04:24:45+5:30
कुपवाड : शहरातील अवधूत कॉलनी येथे नागरिकांसाठी लवकरच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या हॉस्पिटलचा शहरवासीयांना निश्चितपणे फायदा होणार ...
कुपवाड : शहरातील अवधूत कॉलनी येथे नागरिकांसाठी लवकरच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या हॉस्पिटलचा शहरवासीयांना निश्चितपणे फायदा होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केेले.
शहरातील प्रभाग एकमधील अवधूत कॉलनी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची पाहणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सायंकाळी केली. यावेळी ते कुपवाडमधील राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक आणि जनतेसोबत बोलत होते. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक शेडजी मोहिते, नगरसेविका पद्मश्री पाटील, नगरसेविका सविता मोहिते, रईसा रंगरेज प्रमुख उपस्थित होते.
कुपवाड सर्व्हे नंबर १७९ जुना सर्व्हे नंबर ४५९, अवधूत कॉलनी, कुपवाड येथे महानगरपालिकेची ६६ गुंठे खुली जागा आहे. येथे हॉस्पिटल उभारण्यासाठी नगरसेवक शेडजी मोहिते, नगरसेविका पद्मश्री पाटील, नगरसेविका सविता मोहिते, रईसा रंगरेज यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री जयंत पाटील यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना सूचना दिल्या होत्या.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हॉस्पिटलसाठी तीस कोटी रुपये निधी मंजूर करण्याची ग्वाही दिली होती. शनिवारी पालकमंत्री पाटील यांनी कुपवाडमधील जागेची प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या. या हॉस्पिटलचा कुपवाडच्या जनतेला निश्चितच फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राहुल पवार, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, मुस्ताक रंगरेज, नगरसेवक विष्णू माने, राष्ट्रवादीचे शेखर माने, सुनील भोसले, विजय नाईक, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
फोटो : २५ कुपवाड १
ओळ : कुपवाडमधील अवधूत कॉलनी उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची पाहणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक शेडजी मोहिते, नगरसेविका पद्मश्री पाटील उपस्थित होते.