कुपवाडची ड्रेनेज योजना लवकरच मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:38+5:302021-02-05T07:19:38+5:30

कुपवाड : कुपवाड शहरासाठी महत्वपूर्ण असलेली प्रस्तावित कुपवाड ड्रेनेज योजना लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री ...

Kupwad's drainage scheme will be completed soon | कुपवाडची ड्रेनेज योजना लवकरच मार्गी लावणार

कुपवाडची ड्रेनेज योजना लवकरच मार्गी लावणार

Next

कुपवाड : कुपवाड शहरासाठी महत्वपूर्ण असलेली प्रस्तावित कुपवाड ड्रेनेज योजना लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील अकूजनगर येथील विविध विकासकामांच्या प्रारंभाप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर सुरेश पाटील, धनपाल खोत, नगरसेवक राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, नगरसेवक शेडजी मोहिते, मनगू सरगर प्रमुख उपस्थित उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, विस्तारीकरणामुळे सध्या गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे कुपवाड शहरासाठीची पाणी योजना प्राधान्य क्रमानुसार केली. त्यामध्ये विस्तारित उपनगरात चौदा पाण्याच्या टाक्या बांधल्या. तसेच आता शहराच्या गरजेनुसार भुयारी गटार योजना होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनीही या कामास अनुकूलता दर्शवली आहे. जलसंपदा मंत्रालय या कामासाठी तत्परता दाखवत असून लवकरच कुपवाडची ड्रेनेज योजना मार्गी लावणार आहे. याबरोबरच कोरोना काळात नागरिकांना दवाखान्याचे महत्व समजले आहे. त्यामुळे कुपवाड मधील हॉस्पिटलला विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे. शहरासाठी आता एक नाही तर दोन हॉस्पिटल उभे करू.

कोरोना कालावधीत आयुक्त कापडणीस यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कामाला राष्ट्रवादीबरोबर भारतीय जनता पार्टीनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करणे योग्य असल्याचा निर्वाळाही त्यांनी यानिमित्ताने दिला.

शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक विष्णू माने यांनी कुपवाडला भुयारी गटार योजना मंजूर व्हावी. अल्पसंख्याक समाजासाठी सदभावना हॉल मिळावा अशी मागणी केली. राहुल पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास बाळासाहेब माने, नारायण देवकाते, महेश सागरे, जितेंद्र हेगडे, उद्योजक जयपाल चिंचवाडे, अंंकुश चव्हाण, गणेश माने उपस्थित होते.

फाेटाे : येणार आहे

Web Title: Kupwad's drainage scheme will be completed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.